Home वरोरा आंदोलन :- स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून किशोर डुकरे यांनी घातले पाचशे मीटर...

आंदोलन :- स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून किशोर डुकरे यांनी घातले पाचशे मीटर लोटांगण.

 

जी,एम,आर कंपनी समोर प्रहारचे लोटांगण व ठिय्या आंदोलन. स्थानिकांच्या रोजगारा संदर्भात प्रहार आक्रमक.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरालगत औद्योगिक महामंडळाची स्थापना करण्यात आली. यात वर्धा पॉवर प्लांट व जि एम आर पॉवर प्लांट सारख्या दोन मोठ्या वीजनिर्मिती करणारे प्रकल्प उभे झाले . स्थानिकांना रोजगार मिळेल अशी आशा प्रफुल्लित झाली मात्र या दोन्ही कंपन्यांच्या हेकेखोर धोरणामुळे स्थानिक बेरोजगार युवकांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले . आणि रोजगारापासून स्थानिकांना वंचित राहावे लागले . गेल्या अनेक महिन्यापासून पक्षाकडून निवेदने देवूनही कुठला ही मार्ग न निघाल्याने ९ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून . जी एम आर कंपनी समोर प्रहार सेवक किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले .

आंदोलनाची सुरवात किशोर डुकरे यांनी पाचशे मीटर लोटांगण घालून केली . त्या नंतर कंपनीच्या गेट समोर ठीया आंदोलन करण्यात आले .विविध नारे देवून कंपनीच्या हेकेखोर धोरणाचा निषेध करण्यात आला . जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांच्या सहकार्याने कंपनी व्यवस्थापन आंदोलन कर्त्यांशी बोलायला आले . त्यात कंपनीच्या हेकेखोर धोरणामुळे व आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या कडे नसल्याने त्यांनी आंदोलन स्थळावरून पळ काढला . एखाद्या लोकप्रिनिधींकडून शिफारस मिळाल्यानंतर इतर तालुक्यातील जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार कसा मिळतो हा प्रश्न प्रहार सेवक आशिष घुमे यांनी विचारताच कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी यांची धांद्री उडाली होती . कंपनी प्रशासनाने कुठलाही तोडगा न काढल्याने . एकदिवसीय आंदोलन समाप्त करून या पुढे गनिमी काव्याने कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला .त्या नंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
या वेळी प्रहार सेवक आशिष घुमे , पिंटू वासेकर, येवती येथिल ग्रामपंचायत सदस्य हर्षद ढोके , शुभम नरडे, प्रमोद देठे , ओंकार कांबळे तथा इतर प्रहार सेवक उपस्थित होते

Previous articleसनसनीखेज :- चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक व नातेवाइकांवर गुन्हे दाखल
Next articleसावधान :- दीपक आसावानी करतो नवनवीन बायकांशी व मुलीशी ओळख आणि करतो प्रेमाचे नाटक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here