Home चंद्रपूर खळबळजनक :- प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून केला प्रेमीकेचा खून.

खळबळजनक :- प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून केला प्रेमीकेचा खून.

 

प्रेमाच्या गावांत बाराच्या भावात. प्रेमाचा नादच खुळा.

नागभीड प्रतिनिधी :-

आजकाल प्रेमाचा भंग झालेल्या प्रेमी युगलाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काही दिवस प्रेमाच्या उत्सव साजरा केल्यानंतर प्रेमाचा जणू विटाळ होतो आणि मग झगडे भांडण होऊन प्रेमाचा संसार मोडतो अशा अनेक चुरस कथा ऐकायला मिळत असून एका महिलेचे लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर माहेर गाठले. इथे माहेरी तिचे संबंध दुसऱ्या युवकाशी जुळले, त्यात त्यांनी प्रेमाचा भरपूर आनंद घेतला परंतु या युवकासोबत सुद्धा भांडण झाले व त्या युवकाचा राग अनावर झाल्याने प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या घरी जात तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केला यामध्ये विवाहित प्रेयसीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.ही बाब आता गंभीर असून प्रेमाच्या गावात आणि बाराच्या भावात अशी अवस्था दिसत आहे.

पूजा रवींद्र सलामे वय 28 असे मृत विवाहित महिलेचे नांव असून मृतक महिलेचा विवाह चिखल परसोडी येथील बागडे नामक युवकासोबत झाला होता. मात्र नवऱ्याशी निर्माण झालेले मतभेद व नेहमी होत असलेले भांडण यामुळे पूजा ने नागभीड येथे असलेलं माहेर गाठले. काही दिवस माहेरी राहिल्यावर परसोडी येथील 25 वर्षीय युवक विवेक ब्रह्मदास चौधरी सोबत पुजाचे प्रेमसंबध जुळले. मागच्या महिन्यात पूजा व विवेक यांचं काही कारणावरून भांडण झालं होतं, या भांडणाचा निपटारा करण्यासाठी विवेक सकाळी पूजाच्या घरी आला, त्यावेळी पुजाची आई घराबाहेर गेली असल्याने विवेकने या संधीचा फायदा घेत पूजाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात पूजाचा जागीच मृत्यू झाला, आरोपी विवेकने आपल्या प्रेयसीची हत्या केल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा कबूल केला. नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोरवते यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत, मृतदेह शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले. आरोपी विवेक वर कलम 302,452 भादवी सहकलम 3(2)(5) अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारीत 2015 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूरातील “मयूर एजन्सी” कडून ग्राहकाची फसवणूक.
Next articleलक्षवेधी:- कसलं स्वातंत्र्य आणि कसलं काय? हा तर आर्थिक सामाजिक आणि राजकीय गुलामगिरी चा काळ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here