Home चंद्रपूर सनसनीखेज :- पतीने पत्नीला मारहाण करून केली आत्महत्या तर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू.

सनसनीखेज :- पतीने पत्नीला मारहाण करून केली आत्महत्या तर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू.

प्रेमविवाह झालेल्या या जोडप्याने दोन लहान मुलांना पोरके करून संपवली जीवनयात्रा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पती पत्नीच्या भांडणाचा परिणाम काय होतो व कुठल्या स्तरांवर तो पोहचतो याचे ज्वलंत उदाहरण आज चंद्रपूर जिल्ह्यातील घूग्गूस येथे घडले असून पहाटेच्या सुमारास घराच्या बाहेर कडू लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून पतीने आत्महत्या केल्यानंतर काही वेळातच पत्नीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच काही लोक धावून आल्याने पत्नीला वेळीच रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र सायंकाळच्या सुमारास पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची सनसनीखेज घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल मंगळवारी घुग्घूस येथील अमराई वार्डात सकाळच्या सुमारास सुरत गंगाधर माने याचा तर सायंकाळी रुग्णालयात पत्नी रत्नमाला उर्फ सोनी हिचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र. 1 येथील सुरज गंगाधर माने (28) यांनी घराच्या अंगणातील कडुनिंबाच्या झाडाच्या फांदीला नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली तर काही वेळातच त्याची पत्नी रत्नमाला उर्फ सोनी माने (25) ह्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु काही लोकांना तिचे जीव वाचविण्यात यश आले. या घटनेची माहिती होताच काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहीका बोलावून गंभीर अवस्थेत असलेल्या पत्नी रत्नमाला माने हिला घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले परंतु प्रकृर्ती अत्यवस्थ झाल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी रूग्णालयात पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न नव्हे तर पतीने आत्महत्या करण्यापूर्वी तिला जबर मारहाण केली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागला. यात ती गंभीर जखमी झाली उपचारादरम्यान सायंकाळी पत्नीचा तर सकाळी पतीने आत्महत्या करून जिवनयात्रा संपविली आहे.

प्रेमाच्या लग्नाचा असा झाला शेवट. दोन मुले उघड्यावर.

प्रेम हे प्रेम असतं ज्याचं त्याचं सेम असतं असे म्हटल्या जाते पण काही प्रेम हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले असेल तर त्याचा शेवट अखेर कडू होतो अशाच प्रकारचे प्रेम सुरज व रत्नमाला यांच्यात होते. दोघांचा प्रेमविवाह झाला पण आपसात भांडणे झाली आणि शेवटी दोघांनीही जगाचा निरोप घेतला त्यांना आयुष 4 वर्षाचा व आर्यन 2 वर्षाचा अशी दोन लहान मुल आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र दोघांच्याही मृत्यूने दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत.

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती.
Next articleते चिकन फ्रॉय चोर पत्रकार उतरले गुंडगिरीवर,संपादक संजय कन्नावार यांच्यावर गुंडाकरवी प्राणघातक हल्ला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here