Home चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार क्षेत्रात मनसेच्या कामगार संघटना उभ्या राहणार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या हस्ते चंद्रपुर जिल्ह्यातील घुघुस औद्योगिक परिसरातील कामगार व वाहतूकदाराचे सतत प्रश्न सोडविणारे रविश सिंग यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यातील कंपन्यात मनसेची कामगार सेना मुसंडी मारेल असे संकेत मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले ऊद्दोग बघता त्यामधे लाखों कामगार कर्मचारी काम करतात पण त्यांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन व इतर आवश्यक सुविधा कंपनी व्यवस्थापन पुरवीत नाही, त्यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ज्या कामगार संघटना आहे त्या कंपनी व्यवस्थापनाच्या दावणीला बांधल्या गेल्या आहे, त्यामुळे कामगारांच्या हक्क अधिकारांसाठी लढणारी एक लढवय्यी संघटना आवश्यक होती आणि त्याची पूर्तता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ही पूर्ण करेन त्यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना बळकट करू अशी ग्वाही नवनियुक्त कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांनी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या पुढाकाराने व जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांत मोठा जोश निर्माण झाला असून पक्ष बळकटी करिता पक्षाला एक मोठा आधार या कामगार सेनेच्या माध्यमातून मिळेल असे मत पक्षाचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी व्यक्त केले.

Previous articleवरोरा तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे, मनविसे ची जम्बो कार्यकारणी घोषित.
Next articleसनसनीखेज :- पतीने पत्नीला मारहाण करून केली आत्महत्या तर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here