मनसे नेते राजूरकर व जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांची उपस्थिती. वरोरा तालुका मनसेमय होणार.
वरोरा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेची नवी कार्यकारणी पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार व मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी नुकतीच दि१६/८/२०२१ ला शीद्धकला लॉन वरोरा येथील कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केली असून मनविसे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मूज्जमिल शेख तर मनसे वरोरा शहर अध्यक्ष म्हणून राहुल लोनारे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकर्ता मेळाव्यात मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, यात मेळाव्यात मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात व जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा तालुका मनसे व मनविसे कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात मनसे शहर अध्यक्ष म्हणून राहुल लोनारे, शहर उपाध्यक्ष म्हणून कुणाल गौरकार,श्रीकांत तळवेकर,शहर संघटक म्हणून हर्षद घोडिले.तालुका उपाध्यक्ष म्हणून प्रमुख जबाबदारी प्रशांत बदकी तर तालुका सचिव म्हणून महत्वाची जबाबदारी कल्पक ढोरे यांच्याकडे देण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत मोठे बदल करण्यात आले असून मनविसे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मुज्जमील शेख यांची नियुक्ती करण्यात येऊन तालुका अध्यक्ष म्हणून अभिजित आस्टकार तर शहर अध्यक्ष म्हणून अनिकेत पुरी यांची नियुक्ती करण्यात आली.यामधे मनविसे शहर संघटक म्हणून संदेश तामगाडगे तर तालुका संघटक म्हणून तुषार केदार, शहर उपाध्यक्ष म्हणून धीरज गायकवाड.प्रितम ठाकरे.चेतन निकोडे. संकेत पिपरे आणि तालुका उपाध्यक्ष शुभम कोहपरे.सचिन मांडवकर गणेश खडसे, विभाग अध्यक्ष म्हणून कुणाल देवतळे यांना नियुक्ती देण्यात आली.
मनसेच्या या कार्यकर्ता मेळाव्यात शहर व तालुक्यातील बहुसंख्य महिला व पुरुष महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमात मनसे नेते रमेश राजूरकर यांनी आजच्या नव्या पिढीतील तरुणांनी कोणता ऊद्दोग करावा याबद्दल मार्गदर्शन केले तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांनी पक्ष संघटन वाढवावे व पक्षाने दिलेले पद हे समाजकार्य यासाठी लावून तालुक्यात पंचायत समिती व शहरात नगरपरिषद निवडणुकीत यश मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांनी केले या प्रसंगी मनवीसे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने. तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, तालुका सचिव कल्पक ढोरे.राहुल लोणारे, राजेंद्र धाबेकर, राजू नवघरे, सुभाष लहोडिया, शरद पुरी,गणेश खडसे संकेत पिपरे, पवन उमरे इत्यादींनी परिश्रम घेतले.