अनिल मुळे यांची आत्महत्या नव्हे तर प्रशासनाने केलेली हत्त्याच? एका ऑडियो वरून मिळाले संकेत.
पोलीस पंचनामा :-
पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे रा-तोंडार तालुका उदगीर जिल्हा लातूर हे ट्रेंनिग पूर्ण झाल्यापासून अमरावती येथे पोस्टिंग वर होते त्यांना दिनांक 30/08/2019 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली व CID पुणे येथे त्यांची नेमणूक दिली परंतु वरिष्ठांनी चौकशी लावल्यामुळे त्यांना पपदोन्नतीवर सोडले नाही व पदोन्नती दिली नाही. दरम्यान तब्येत बिघडल्याने ते रजेवर गेले व ठीक झाल्यानंतर हजर होण्यासाठी ते गेले असता त्यांना कोणीही कर्तव्यावर रुजू करून घेतलं नाही. आता एकाच प्रकरणात दोन वेळा शिक्षा देण्यात आल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडली व त्यांनी दिनांक 13/08/2021 ला एका झाडाला टांगून घेऊन आत्महत्या केली.
अनिल मुळे यांना दोन लहान मुली आहेत त्यापैकी १ चार वर्षाची व दुसरी २ वर्षाची आहे त्यांच्या अकस्मात आत्महत्या करन्याने पोलीस उपनिरीक्षक मुळे परिवारावर आभाळ कोसळले असून त्यांना पोलीस प्रशासनाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनिल ची एक प्रकारे हत्त्या आहे त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
ऑडियो रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने खळबळ.
पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी आत्महत्या का केली त्यामागची काय कारणे आहेत याबद्दल एक ऑडियो व्ह्ययरल झाल्याने मोठी खळबळ उडाली असून त्या ऑडियो मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांचे निलंबन होऊ शकते अशी शक्यता बळावली आहे.