Home चंद्रपूर लक्षवेधी:- अन्ना हजारे यांचे डोके ठिकाणावर आहे का?

लक्षवेधी:- अन्ना हजारे यांचे डोके ठिकाणावर आहे का?

 

अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडून अन्ना हजारे यांनी घेतली सुपारी?

लक्षवेधी:-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्याने जेष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांना म्हणे मोठा संताप झाला आणि त्यांनी सरकारच्या दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका टाकण्याची घोषणा केली यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी अन्ना हजारे यांना सुपारी देऊन जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करण्याचे छडयंत्र तर सुरू केले नसावे अशी शंका निर्माण होत आहे. खरं तर अन्ना हजारे यांनी अगोदर आपल्या अहमदनगर जिल्ह्याची दारूबंदी करायला हवी आणि मग चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करायला उच्च न्यायालयात धाव घ्यायला हवी, पण “मुंह मे राम बगल मे छुरी” असा स्वभावगुण असणारे अन्ना यांनी स्वतःची विश्वसनीयता संपवली आहे. कारण केंद्र शासनाने लोकपाल बिल आणावे म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे अन्ना आता भाजपची केंद्रात एकहाती सत्ता असताना लोकपाल बीलाबाबत का आंदोलन करत नाही? केंद्र सरकारने राष्ट्रीय संपती विकण्याचा सपाटा सुरू केला तेंव्हा आन्ना हजारे यांचे देशप्रेम का जाहीर होत नाही? देशात भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी वाढली असतांना त्यांना केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याची इच्छा का होत नाही? असे नानाविध प्रश्न अन्ना हजारे यांना विचारले तर त्यांच्याजवळ याचे उत्तर नाही असेच एकूण चित्र दिसत असताना त्यांना फक्त चंद्रपूर जिल्ह्यातच दारूबंदी उठवली म्हणून संताप होतो आणि बाकी विषय यांना गंभीर वाटत नाही तर मग अण्णांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील जनता आता विचारू लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल २०१५ मधे दारूबंदी झाल्यानंतर खरं तर जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती कारण राजकीय राजाश्रय मिळालेले पक्षीय कार्यकर्ते यांनी आपापले क्षेत्र अवैध दारू विक्रीसाठी तयार केले होते,त्यात एकेकाचे वीस पंचवीस चिल्लर विक्रेते मिळून एक गट तयार झाला होता आणि त्यामुळे गुंडगिरीला एक प्रकारे चालना मिळाली होती कारण ज्यांना राजकीय पाठबळ तोच दारू विकायचा त्यामूळे अवैध दारू विक्रीच्या धंद्यात राजकारण शिरले होते.यामधे राजकीय नेत्यांना महिन्याचे पोलीस अधिकाऱ्याप्रमाणे हप्त्याचे पैसे जायचे अर्थात हा अवैध दारूचा व्यवसाय संघटित गुन्हेगारी ला चालना द्यायचा, त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास बल्लारपूर येथे सूरज बहुरीया हत्त्याकांड आणि त्यानंतर सूरज बहुरीया यांची हत्त्या करणाऱ्यांवर सूरज बहुरीया समर्थकांनी केलेला बंदुकीने हल्ला. हे उदाहरण देता येईल.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे झालेले नुकसान.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात दारू विक्री पासून शासनाला जाणारा महसूल बुडाला.जे चोर लुच्चेगिरी करणारे व गुंड बदमाश होते तेच अवैध दारूच्या व्यवसायात होते त्यामुळे त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात पैसा आल्याने त्यांची दादागिरी वाढली होती व संघटित गुन्हेगारी वाढली होती त्यामुळे सर्वसामान्य माणसावर अन्याय व्ह्यायला लागला होता. जिल्ह्यात नकली दारू मोठ्या प्रमाणांत विकल्या जावून त्यापासून हजारो लोकांना बाधा झाली त्यात काहींचा मृत्यु सुद्धा झाला काही ठिकाणी रासायनिक दारू बनविल्या जायची त्यामुळे विषारी दारू पीवुन अनेकांचा मृत्यु झाला. जिल्ह्यात कामगार क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना सायंकाळी दारू पीवुन थकवा घालवायचा असतो त्यांना पन्नास रुपयाची दारू दीडशे रुपयाला प्यावे लागल्याने त्यांचे आर्थिक बजेट बिघडून त्यांच्या घरी दररोज भांडणे सुरू झाले होते, अर्थात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी ही जिल्ह्यातील जनतेला कर्दनकाळ ठरली असताना जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ती दारूबंदी उठवून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला एक प्रकारे न्यायच दिला असताना अन्ना हजारे यांनी या बाबतीत लक्ष द्यावे म्हणजे अन्ना हजारे यांना बाकीचे काम नाही का? देशातील सर्व विषय संपले व केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हाच एक विषय शिल्लक राहिला असे आहे का? असा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here