Home राष्ट्रीय चिंताजनक :- देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय.

चिंताजनक :- देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय.

 

२४ तासांत तब्बल ५०९ जणांनी गमावले प्राण.पुन्हा लॉक डाऊन वाढणार ?

न्यूज नेटवर्क वार्ता :-

देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची बाब आता समोर आली असून काल (शनिवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२८ ऑगस्ट २०२१) ४६ हजार ७५९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल ५०९ जणांनी आपले प्राण गमावले असल्याने चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशातील कालच्या एका दिवसातील करोना संक्रमितांपैंकी तब्बल ३२ हजार ८०१ कोविड रुग्ण हे केवळ केरळमधून समोर आले आहेत. तर केरळमध्ये काल १७९ जणांच्या मृत्यूची नोंद झालीय.

केरळ राज्यासोबतच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ३७ हजार ३७० वर पोहचलीय. देशात सध्या ३ लाख ५९ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी ३१ हजार ३७४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ वर पोहचलीय.

देशात एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ आहे तर
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ आहे, देशात ३ लाख ५९ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे तर एकूण मृत्यूची संख्या ही ४ लाख ३७ हजार ३७० वर पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here