Home राष्ट्रीय लक्षवेधी :- चोरांचे भाजपात सहर्ष स्वागत करणारेच एक दिवस बळी पडतील.

लक्षवेधी :- चोरांचे भाजपात सहर्ष स्वागत करणारेच एक दिवस बळी पडतील.

राजकारणाचं चिखल करणाऱ्यानो, त्या चिखलातच तुम्ही गाडले जाण्याची शक्यता,

लक्षवेधी :-

भाजपचं देशातील आणि राज्यातील जे कपट वृत्तीचं व तानाशाही राजकारण सुरु आहे, त्याविषयी जनतेत एवढी चीड निर्माण झाली की लोक आता भाजप च्या नेत्यांना शिव्यांची लाखोळी वाहत आहे, कारण भाजपनं राजकारणाचा चिखल करून ठेवलाय पण यांना माहीत नाही प्रकृती एक दिवस याचं भाजपच्या नेत्यांना त्या चिखलात गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढ्या खालच्या स्तराला राजकारण जाईल हे कुणालाही कळलं नव्हतं पण आता सर्वासामान्य जनतेचा राजकीय नेत्यावरचा विश्वास उडाला आहे आणि त्यातच भाजपाच्या नेत्यावरील विश्वास उडाला आहे.

कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मधे काही लोकांनी खूप चोरी केली.हे जनतेला माहिती होते व सरकारला सुद्धा माहिती आहे. हे पवार ठाकरे राहुल गांधींना माहिती आहे.पण या चोरांची पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना नितांत गरज असते. कारण हे चोर म्हणजे मदारीची माकडे.कोणाचेही पाकिट चोरून मदारीकडे आणून देतात.हे तुम्ही आपण सर्वांना माहीत आहे.ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती आहे. अमित शहा फडणवीस यांना माहिती आहे. म्हणूनच तर भाजपत खेचून घेत आहेत.”या , आमच्या पक्षात येऊन चोरी करा.आमचा वाटा आम्हाला द्या.तुमचा वाटा तुम्ही न्या.येथे तुम्हाला कोणीही इडी, बेडी लावणार नाही.”

पटेल हे पवारांचा खजिना सांभाळत असत. खान पान मान शान सांभाळत असत. हे मोदींनी हेरले.अरे!असा गुणवान, धनवान माणूस आपल्या पक्षात पाहिजे.म्हणून खेचला, येनकेन प्रकारे शिंदे कडे ठाकरेंचा खजिना होता.खान पान मान शान अनेक वर्ष सांभाळून होते.हे मोदींनी हेरले.अरे !असा गुणवान माणूस आपल्या पक्षात पाहिजे.फडणवीस कडे जबाबदारी सोपवली.कोणी म्हणे खोका दिला.कोणी म्हणे खंबा दिला.ते शिंदेंना त्यांच्या तंबूत खेचण्यात यशस्वी झाले. इकडे पाटील पटोलेंची सर्वच तजबीज करीत असत.अजितदादा तर काकांचे गळ्यातील ताईत होते.त्यांच्या जिवावर भारी होते.माझा दादा ,अजितदादा.पण दादांना सुद्धा इडी आणि बेडी दाखवली.”डिकरा, आप आपको हमारे हवाले कर दो.कोई माईका लाल आपका बाल बांका नही कर सकता.जो करते है,वो हम है.हमने पकडा तो काका भी कुछ नहीं कर सकते.” अजितदादांनी विचार केला काकांचे वय झाले.ते आता मला वाचवू शकणार नाहीत.आता आपली सोय आपणच करून घ्या.त्यांनी अंधारातच जम्प मारली.थेट भाजपच्या तंबूतच. त्यांनी काकांच्या दुखाचा ,वेदनांचा विचार केला नाही.ज्यांनी केला तो नातू आता इडी च्या चकरा मारत आहे. म्हणून अजितदादा म्हणतात,”बेटा तू अजून लहान आहेस. मला कळले ते तुला कळायला वेळ लागेल.”

शिंदे, अजितदादा यांचे सोबत आलेली माणसे भाजप च्या वाशींग मशीन मधे धुवून घेतली म्हणे पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.हिच माणसे एक दिवस मोदी,शहा, फडणवीस यांचे उपरणे पळवून नेतील. कारण भाजपचा तंबू असा फुगत फुगत खूप मोठा होईल. आतील चोर एकमेकांना लाथा घालतील.तंबू फाडून बाहेर पडतील.घम़डी बेडकाने बैलाचा आकार घेण्यासाठी,इतका फुगला कि,त्याचा स्फोट झाला.असा धडा इंग्रजीत आहे.

राज्यातील अनेक चोरांना भाजपने पोटात सामावून घेतले.या! दक्षिणा द्या, निवांत राहा, निश्चिंत राहा, तरीही ज्यांना जन्मजात चोरीची सवय आहे ते चोरी करीतच आहेत, कोणी रस्ता चोरतो.कोणी गटार चोरतो, कोणी डांबर चोरतो.कोणी सिमेंट चोरतो, अख्खे राज्य बरबाद करून ठेवले. कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि आता भाजप यांचे, एकच ध्येय, सपाटून काम, अपना विकास, सबका भकास! हिच मोहिम चालू आहे, जनता मात्र यांची वकालत करण्यात अडकली आहेत, बुद्धी कमी, अक्कल कमी, हिंमत कमी, किंमत कमी, यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे,आपणच आपले हित जोपासणे, आमचा रस्ता बनला पाहिजे, आमची गटार बनली पाहिजे, आमचे पाणी मिळाले पाहिजे, शाळा, दवाखाना, ओपन स्पेश तर विकून टाकले, जे आहेत ते तरी वाचवले पाहिजे अशाप्रकारची मोहिम आता सुज्ञ नाकारिकांनी हाती घेतली पाहिजे हीच काळाची गरज आहे.

शिकंदर ग्रीसहून मेसाडिनोया पर्यंत आला.तोपर्यंत त्याचेकडे ग्रीक सैनिक होते, ते थकले होते, भारतापर्यंत येऊन लढाई करायला ते तयार नव्हते, म्हणून शिकंदरने चोरांना, लुटारूंना, वाटमाऱ्यांना सैन्यात भरती करून घेतले, सौदा केला‌, लढाईत लुट तुमची,राज्य माझे हे ठरले व ते चोर, लुटारु तयार झाले.भारतावर स्वारी केली, राजा पौरवा ला पराजित केले. पण पुढे येण्यास हेच सैनिक तयार झाले नाहीत, त्यांनी खूप लुटमार केली होती, परत जाऊन ठेवून येऊ म्हणाले, म्हणून शिकंदर आणि चोर परत मेसाडिनोया कडे निघाले, त्या चोर, लुटारु सैनिकांनी शिकंदरला रस्त्यावरच लुटून खून केला हा इतिहास आहे आणि आज जे देशात आणि राज्यात अनेक पक्षातील चोरांची भरती भाजप मध्ये होतांना दिसत आहे त्याच चोरांचं स्वागत करणारे मोदी, शहा आणि फडणवीस यांचा बळी घेतील एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here