Home वरोरा घर तिथे मनसे कार्यकर्ता हा संकल्प घेऊन पक्षाची वाटचाल होणार.

घर तिथे मनसे कार्यकर्ता हा संकल्प घेऊन पक्षाची वाटचाल होणार.

 

मनविसे राज्य उपाध्यक्ष मंगेश डुके यांचे प्रतिपादन.वन बूथ टेन यूथ हे समीकरण घेऊन पक्षाची टाकत वाढविणार

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष मंगेश डुके यांच्या उपस्थितीत आज दिनांक २८ ऑगस्ट ला वरोरा येथील हॉटेल श्रूजन येथे पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थी सेनेची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. पक्ष संघटन वाढवून पक्षाची येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांमधे सत्ता मिळविण्यासाठी मनविसे ची नवी कार्यकारणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत मनविसे राज्य उपाध्यक्ष मंगेश डुके यांच्यासह पक्षाचे नेते रमेश राजूरकर. जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार. मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार.कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविश सिंग जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. तालुका अध्यक्ष वैभव डहाने. शहर अध्यक्ष राहुल लोनारे इत्यादींची उपस्थिती होती.यावेळी मनविसेची नवी कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामधे मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मूज्जमिल शेख, मनविसे विधानसभा संघटक राहुल खारकर, तालुका अध्यक्ष अभिजित आस्टकार, शहर अध्यक्ष अनिकेत पुरी, शहर संघटक संदेश तामगाडगे, तालुका संघटक तुषार केदार, शहर उपाध्यक्ष धीरज गायकवाड. प्रितम ठाकरे.चेतन निकोडे. संकेत पिपरे,मनविसे तालुका उपाध्यक्ष शुभम कोहपरे.सचिन मांडवकर गणेश खडसे, विभाग अध्यक्ष कुणाल देवतळे यांच्या नावाची घोषणा कार्यकारणीमधे करण्यात आली.

मनविसे राज्य उपाध्यक्ष मंगेश डुके यांनी नव्या मनविसे कार्यकारणी संदर्भात माहिती देतांना सांगितले की जुने मनविसे पदाधिकारी कार्यरत होते त्यांना आता मनसेच्या मुख्य बॉडी मधे घेण्यात येणार आहे. पक्षात कुठलीही गटबाजी नाही व पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी नव्या मनविसे कार्यकारणी कडून मोठी अपेक्षा आहे. घर तेथे मनसे असा नवा संकल्प घेऊन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी वन बूथ टेन यूथ हे समीकरण पक्षातर्फे अमलात आणण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी परिश्रम करेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने. तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, तालुका सचिव कल्पक ढोरे.राहुल लोणारे, पवन उपरे, राजेंद्र धाबेकर, राजू नवघरे, सुभाष लहोडिया, शरद पुरी,गणेश खडसे संकेत पिपरे, पवन उमरे गवश्या गोबाडे इत्यादीं परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here