Home महाराष्ट्र अमित ला पक्षाची धुरा खांद्यावर घेताना बघून वेगळाच आनंद होतोय.

अमित ला पक्षाची धुरा खांद्यावर घेताना बघून वेगळाच आनंद होतोय.

 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे भावनिक उद्गार, तीन पिढ्यांचा सहवास लाभल्याचे भाग्य.

मुंबई मनसे वार्ता:-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर स्वतः शिवसेनेचे आमदार असतांना बाळा नांदगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत जाण्याची परवानगी मागितली व त्यावेळी बाळासाहेबांनी ती दिली सुद्धा कारण त्यावेळी बाळा नांदगावकर बाळासाहेबांना म्हणाले होते की साहेब आपल्याकडे खूप लोक आहेत आमदार खासदार आहेत पण राजसाहेबांकडे कोणी नाही त्यामूळे मला त्यांच्यासोबत जावे लागेल. असे म्हणणारे तत्कालीन आमदार फक्त आणि फक्त बाळा नांदगावकर हेच होते आणि एवढ्या वर्षाच्या खडतर प्रवासानंतर सुद्धा नवीन पक्षात येऊन मोठे झालेले प्रवीण दरेकर असो की वसंत गीते असो ते पक्षाच्या संकट काळातराज साहेबांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले पण स्वतः राज्याचे गॄहराज्य मंत्री राहिलेले बाळा नांदगावकर हे मात्र कायम राज साहेबांसोबत राहिले त्यामूळे पक्षात राज साहेबांचे कट्टर समर्थक व खास विश्वासू कुणी असेल तर ते बाळा नांदगावकर हेच आहेत हे विसरून चालणार नाही.

मनसे नेते बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशानुसार 26 तारखेपासून पासून नाशिक दौऱ्यावर होते, यावेळी नाशिकच्या 122 वार्डातील सामन्यातील सामान्य कार्यकर्त्यांना भेटून त्यांची मनोगते ऐकून घेऊन त्यांच्या नेमणुकी बाबतीत त्यांनी पक्ष प्रमुखांना अहवाल सादर सुद्धा केला आहे.

ते नाशिक दौऱ्यावर असताना आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की नाशिक मध्ये अमित ठाकरे , नितीन सरदेसाई आणि मी व शिरीष सावंत अशा 3 विविध टीम बनवून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात आम्हाला सहकारी म्हणून अनिल शिदोरे, संदीप देशपांडे, संजय नाईक , अमेय खोपकर , अविनाश जाधव, किशोर शिंदे, नितीन केरकर, दिलीप कदम, योगेश खैरे, योगेश परुळेकर, आदि सहकाऱ्यांची तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची साथ लाभली.

या दौऱ्यात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे सामान्य जनतेला विशेषतः तरुणांना अमित बद्दल असलेली आपुलकीची भावना व आकर्षण. अमित अतिशय मितभाषी , सामान्यतल्या सामान्य कार्यकर्त्याचे हि ऐकून घेणारा. अमित ला पक्षाची धुरा खांद्यावर घेताना बघून वेगळाच आनंद होतो. मा.राजसाहेब हे स्वतः मागील अनेक महिन्यांपासून थेट कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत. आपला पक्ष हा केवळ निवडणूकीवर लक्ष केंद्रित करून राजकारण करणारा नव्हे तर लोकांना केंद्रस्थानी ठेवून समाजकारण करणारा आहे. राजकीय जीवनात यश अपयश हे चालूच असते महत्त्वाचे आहे ते या दोन्ही परिस्थितीत कार्यकर्त्यांशी असलेली नाळ घट्ट बांधून ठेवण्याची आणि याबाबतीत आपला पक्ष हा नक्कीच अग्रेसर आहे. आज कोणतीही सत्ता, लाभाचे पद नसतानाही साहेबांमुळे आपल्या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा कायमच ओढा असतो हेच सध्या नाशिक येथेही दिसून आले. येणाऱ्या निवडणुकीत या प्रतिसादाला आपणास यशाचे रूप द्यायचे आहे व त्यासाठी आपण यथाशक्ती प्रामाणिकपणे एकजुटीने मेहनत घेऊ यात असे आवाहन त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

ते पुढे म्हणाले की कोणताही सामना हा “टीम वर्क” नेच जिंकू शकतो, मी स्वतः दहीहंडी चा ही खेळाडू असल्याने टीम वर्क चे महत्त्व जाणून आहे. आपला कॅप्टन ( राजसाहेब ) सगळ्यात जोरदार आहेच आता आपण सर्व आपल्या “कॅप्टन” ला सर्वार्थाने साथ देऊन इथून पुढील सर्व लढाया जिंकण्याचा प्रयत्न करू यात. वैयक्तिक रित्या मी स्वतःला खुप भाग्यशाली समजतो, स्व. मा.बाळासाहेब, मा.राजसाहेब व आता अमित या ठाकरे घराण्यातील तिन्ही पिढ्यांबरोबर मला काम करायला लाभले. हे भावनिक नाते असेच कायम राहो अशी परमेश्वराकडे त्यांनी मागणी सुद्धा केली आहे.

Previous articleकृषि वार्ता :- सोयाबिनवरील खोडकीडा व लष्करी अळीपासून बचावासाठी कृषिदुताने केले मार्गदर्शन.
Next articleघर तिथे मनसे कार्यकर्ता हा संकल्प घेऊन पक्षाची वाटचाल होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here