Home वरोरा कृषि वार्ता :- सोयाबिनवरील खोडकीडा व लष्करी अळीपासून बचावासाठी कृषिदुताने केले मार्गदर्शन.

कृषि वार्ता :- सोयाबिनवरील खोडकीडा व लष्करी अळीपासून बचावासाठी कृषिदुताने केले मार्गदर्शन.

 

कृषि महाविद्यालय कोंघारा येथिल विद्यार्थी गौरव गजानराव महल्ले यांचा उपक्रम.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांवर खोडकिडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव बघता यावर उपाययोजना करणे आवश्यक झाले असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित असलेल्या कृषि महाविद्यालय कोंघारा येथिल विद्यार्थी गौरव गजानराव महल्ले याने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वरोरा परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना खोडकीडा व लष्करी अळीपासून बचावासाठी मार्गदर्शन केले असल्याने व इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार असल्याने गौरव महल्ले यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सध्याची सोयाबिनची उभे असलेली पीके व सोयाबिनला असलेला उच्चांकी दर पाहता या वर्षी शेतकरी सुखावतील असे वाटत होते परंतु खोडकीड़ा व त्याचबरोबर आता लष्करी अळीने सुद्ध़ा थैमांन घालायला सुरुवात केली आहे. व त्यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास हाती आलेले पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबिनचे हातात आलेले पीक वाया न जाण्याच्या दृष्टिकोणातून शेतकऱ्यांनी अळीवर्गीय कीटकनाशकांची फवारनी करावी असे आवाहन कृषि मार्गदर्शक बोरकर व कृषिदुत गौरव महल्ले यांनि केले आहे.

या कार्यक्रमला कृषि साहायक बोरकर, रोहित चौधरी, विशाल महल्ले, प्रवीण बूटे,विनोद गावंडे, अथर्व महल्ले,वैभव महल्ले आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here