Home वरोरा संतापजनक :- टेमुर्डा येथील महाराष्ट्र बैंकेच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी.

संतापजनक :- टेमुर्डा येथील महाराष्ट्र बैंकेच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी.

 

दुपारी 12 वाजता पण सुरू होत नाही बैँकेचे व्यवहार. बैंक उघडण्याचा वेळ निश्चित नाही.

किशोर डुकरे तालुका प्रतिनिधी :-

टेमुर्डा येथील बैंक ऑफ महाराष्ट्र ही बैंक येथील खातेदारांना सोयी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असून येथील बैंक कर्मचारी हे बैँकेत उशिरा येऊन मुजोरी करतात व आपला मनमानी कारभार करून येथील खातेधारकांना नाहक त्रास देत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.

काल दिनांक २६ ऑगस्ट ला बैँकेचे व्यवहार खरं तर
बँकिंग व्यवहाराची वेळेनुसार सकाळी 10:30 वाजेपासून सुरू व्हायला हवे होते पण जवळपास दुपारी 12:15 वाजले तरी व्यवहार सुरू झाले नव्हते त्यामुळे बैँके समोर रांगा लागल्या होत्या ही बैंक कमीत कमीत 25 गावाशी जोडली गेली असून प्रत्येक गावामधील महिला बचत गट, जिल्हा परिषद शाळा, शेतकरी आणि व्यावसायिक व्यक्तीचे बँक खाते इथे आहेत पण ही बँक उशिरा उघडण्यात येत असल्याने ग्राहकांची नेहमीच हेळसांड करीत असते.

टेमुर्डा येथील महाराष्ट्र बैंक ही नेहमीच चर्चेत राहत असून कधी लंच टाइम 1 वाजेपासून 2:30 पर्यंत चालते तर कधी कर्मचारी यांच्या अनुपस्थितीत बँक बंद ठेवल्या जात आहे. एकीकडे शेतकरी यांनी पीक कर्ज नाही भरल्यास चालू खात्यातून रक्कम देण्यासाठी टाळाटाळ तर कधी शाळकरी मुलांचे बँक खाते कळण्यासाठी गेलेल्या पालकांना नाहक त्रास दिल्या जाते. काही वेळा तर बैँकेत पैसे नाही म्हणून खाते धारकांना आल्या पावली परत जावे लागते त्यामुळे या संदर्भात बैँकेच्या चंद्रपूर मुख्य शाखेत संपर्क करून प्रहार सेवक किशोर डुकरे यांनी तक्रार केली असल्याची माहिती आहे.

Previous articleवरोरा नगरपरिषद हद्दीत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा.
Next articleकृषि वार्ता :- सोयाबिनवरील खोडकीडा व लष्करी अळीपासून बचावासाठी कृषिदुताने केले मार्गदर्शन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here