Home वरोरा वरोरा नगरपरिषद हद्दीत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा.

वरोरा नगरपरिषद हद्दीत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा.

 

राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाढले असल्याने त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरोरा तालुका अध्यक्ष विशाल पारखी यांच्या नेत्रूत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

शहरातील रस्त्यावर जनावरांना मोकाट सोडणारे लोक घरी सुखाने झोपतात पण त्यामुळे जनतेचा जीव अपघातात जातो, शहरातील सुशिक्षित लोक असे वागतात,खेड्यातील लोकांकडे पण गाय बैल आहे, शेतकरी झोपडीत राहत असला तरी, त्याच्या जनावराला कधी रस्त्यावर मोकाट सोडत नाही ,गायीला माते चा दर्जा देतात ,गाय हमारी माता है ,अस म्हणतात पण सुशिक्षित लोक त्यांना रस्त्यावर सोडतात व कुत्रे घरी बांधतात त्यामूळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा नगरपरिषद मध्ये मोकाट जनावर सोडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी विशाल पारखी तालुका अध्यक्ष,जयंत भाऊ टेमुर्डे ,अविनाश ढेंगळे जिल्हा अध्यक्ष ,विदर्भ प्रदेश अध्यक्ष रंजनाताई पारशिवें, बंडू भाऊ भोंगळे,सामाजिक न्याय चे शहर अध्यक्ष अतुल वानखेळे, वरोरा शहर अध्यक्ष ऍड प्रदीप बुराण उपस्थित होते.

Previous articleसरकारने हिंदू सण उत्सवावर टाकलेल्या बंदी विरोधात मनसेच्या ढोल बजाओ आंदोलनाने वेधले लक्ष.
Next articleसंतापजनक :- टेमुर्डा येथील महाराष्ट्र बैंकेच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here