Home महाराष्ट्र धक्कादायक :- राज्यात पुन्हा का होऊ शकते संचारबंदी.

धक्कादायक :- राज्यात पुन्हा का होऊ शकते संचारबंदी.

मत्रिमंडळाचा दुपारी निर्णय होण्याची शक्यता. जाणून घ्या सविस्तर.

न्यूज नेटवर्क :-

राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या, राजकीय कार्यक्रमातील वाढती गर्दी, व मोठ्या प्रमाणात येणार पुढील सण बघता सरकारपुढे संचारबंदी करण्यापलिकडे दुसरा पर्याय दिसत नसल्याने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संचारबंदीचा निर्णय होण्याची शक्यता दाट आहे. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यासंदर्भात संकेत दिले होते.

आज दिनांक १ सप्टेंबरला दुपारी १२.३० च्या सुमारास मंत्रिमंडळाचा निर्णय होऊ शकतो कारण राज्यात निर्बंध शिथील केल्यानंतर काही भागांत राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर, राज्यात येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्र असे अनेक सण आहेत. त्या सण समारंभात गर्दीमुळं करोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सणांबाबत नियमावली तयार करण्याच्या सूचना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

राज्यात रुग्णवाढीची संख्या अनेक दिवसांपासून देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला करोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना तीनच दिवसांपूर्वी केली होती. याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नाइट कर्फ्यू लागणार असल्याची शक्यता आहे. त्याबाबत आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here