Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात मर्डर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तूल येतात कुठून?

धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात मर्डर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तूल येतात कुठून?

 

लखमापूर छत्तीसगढी मोहल्ला येथून पोलिसांनी जप्त केलेल्या पिस्तूलमुळे उडाली खळबळ.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत पिस्तूल ने झालेल्या हत्तेचे आरोपी सापडले पण या पिस्तूल नेमक्या येतात तरी कुठून याबाबत पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत शोध लावला नाही. बल्लारपूर राजुरा येथे झालेल्या सूरज बहुरीया व राजू यादव यांच्या हत्त्या करण्यासाठी सारख्याच पिस्तूल वापरल्या गेल्या पण त्या नेमक्या कुणाकडून आल्या याबाबत पोलिसांनी कुठपर्यंत तपास केला याचा लेखाजोखा समोर आला नाही त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बंदुका पिस्तूला मोठ्या प्रमाणात येऊन खुलेआम हत्त्या होताना दिसत आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात परप्रांतीय लोकांकडूनच (युपी बिहार) पिस्तूल व बंदुका येतात अशी आजपर्यंत ची माहिती आहे त्यामुळे बाहेर प्रांतातून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या लोकांचे पोलीस वेरिफिकेशन होणे फार गरजेचे आहे.

चंद्रपूर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती की दिनांक. 29/8 /2021 ला लखमापूर छत्तीसगढी मोहल्ला चंद्रपूर येथील रुकधन किराणा दुकान मालक नामे रुकधन परसराम साहु याने त्यांचे घरी देशी बनावटीची पिस्तूल घेऊन लपवुन ठेवले आहे. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून रुकधन किराणा दुकान मालक रुकधन परसराम साहु वय 52 वर्ष रा. लखमापूर वार्ड क्रमांक. 3 चे छत्तीसगढ झोपडपट्टी, चंद्रपूर यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे घर झडतेमध्ये एक देशी बनावटीचे लाँग बॅरल पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळून आली.

त्यांची अंदाजित किंमत ( 10,000 ) दहा हजार रुपये आहे मिळालेली देशी पिस्तल पांच जिवंत काडतुसे जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 865/21कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविन्द साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोकडे, पो.उप. नि. संदीप कापडे, पो. हवा. संजय आतकुलवार, पो. शि. गोपाल आतकुलवार, पो. शि. नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बवरी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here