Home राष्ट्रीय खळबळजनक :- करोनाचा आणखी वेरिएंट आल्याने लस निष्प्रभ ठरण्याची भीती.

खळबळजनक :- करोनाचा आणखी वेरिएंट आल्याने लस निष्प्रभ ठरण्याची भीती.

 

जागतिक आरोग्य संस्थेचा इशारा आता दोन लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाची लागण?

न्यूज नेटवर्क :-

जगभरात करोनाची दुसरी लॉट संपली असतांना आता तिसऱ्या लाटेची शक्यता बळावली आहे, व या कोरोना महासाथीचा आजार जगभरात फैलावत आहे. दीड वर्षानंतरही करोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. तर, दुसरीकडे करोना विषाणूचे नवीन वेरिएंट आढळत असल्याने शास्त्रज्ञांसमोरील आव्हानात भर पडत आहे. आता आणखी एक नवीन वेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हा करोनाचा Mu नावाचा वेरिएंट B.1.621 जानेवारी महिन्यात आढळला होता. आतापर्यंत हा वेरिएंट ४० हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे. जवळपास चार हजार जणांना याची बाधा झाली आहे. या वेरिएंटमुळे लशीचा प्रभाव निष्प्रभ होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली असून हा वेरिएंट अधिक संसर्गजन्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोलंबियामध्ये हा वेरिएंट जानेवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा आढळला. who या जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, या वेरिएंटमुळे होणारे परिणाम सांगण्यासाठी अधिक संशोधन, अभ्यासाची आवश्यकता आहे. या वेरिएंटला ‘वेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ असे जाहीर करण्यात आले आहे. कोलंबियामध्ये Mu हा वेरिएंट पहिल्यांदा आढळल्यानंतर काही बाधित आढळले. आता, दक्षिण अमेरिका आणि युरोपसह दुसऱ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर या वेरिएंटचे बाधित आढळत आहेत. जागतिक स्तरावर बाधितांची संख्या कमी झाली असून ०.१ टक्क्यापेक्षाही कमी प्रमाण आहे. मात्र, कोलंबिया आणि इक्वाडोअरमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here