Home ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन नदी घाटाजवळील “रेतीसाठा” संशयास्पद?

ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन नदी घाटाजवळील “रेतीसाठा” संशयास्पद?

 

पुर आल्यानंतर सुद्धा रेतीसाठा जैसे थे. रेती साठा कुणाचा ? याबद्दल चौकशी होईल का?

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :-

गोसिखुर्द धरणातीला पाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने,वैनगंगा नदीला मागील वर्षी आलेल्या महापुराने कित्तेक गावात पूर आला व जनजीवन विस्कळीत झाले .त्यात रणमोचन नदी काठाजवळील गावं असल्याने या पुराचा जबर फटका रणमोचन ला बसला व सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. मात्र सद्यस्थितीत रणमोचन गावालगत डोलात उभा असलेला अंदाजे पंचवीसशे ब्रास रेतीसाठा हा मागील दोन वर्षापूर्वीचा असल्याचे संबंधीत क्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रतिक्रियेने, रणमोचन जवळील रेतीसाठा संशयाच्या घेऱ्यात येत आहे.

गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 33 दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला मागील वर्षी आलेल्या पुराने हजारो एकर शेतात नदी मधील व काठालगत साठवणूक केलेल्या रेती मुळे संपूर्ण क्षेत्रातील शेताला वाळवंटाचे स्वरूप आले व शेतशिवार नापिकी वर आलेत.

आता रणमोचन नदी घाटालगत अंदाजे पंचवीसशे ब्रास रेतीसाठा डोलात उभा असल्याने गावकऱ्यांशी संवाद साधला असता काही महिन्या पूर्वीच उत्खनन करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.
स्थानिक महसूल प्रशासन या गंभीर प्रकारावर पांघरून घालत असल्याने. जिल्हा विभागाच्या पथकाकडून काय कारवाई केल्या जाते हे पाहणे आता उल्लेखनीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here