Home महाराष्ट्र लक्षवेधी :- कोरोनाच्या लाटा येत आहेत की आणल्या जात आहे ?

लक्षवेधी :- कोरोनाच्या लाटा येत आहेत की आणल्या जात आहे ?

 

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आरोपात सत्य?

लक्षवेधी:-

देशात कोरोना आहे की नाही हा संशोधनाचा भाग असला तरी सरकार आपल्याला कायम भीती दाखवत आहे की कोरोना ची तिसरी लाट येणार आहे कोरोना चा नवीन व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लस ची रुग्णसंख्या वाढत आहे आणि त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा निर्णय होणार आहे. खरं तर कोरोनाचा फायदा घेऊन हजारो कोटींची कामे वाजवली जाता आहेत. त्या विरोधात कोणी काही बोलू नये, मोर्चे काढू नये, सभा घेऊ नये, म्हणून कोरोनाच्या लाटा आणल्या जात आहेत, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मागील मंगळवार ला पत्रकार परिषदेत केला आता त्या आरोपांमधे तथ्य असल्याची भावना राज्यातील जनतेमध्ये निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. कारण कोरोना ची तिसरी लाट येणार आणि ती सुद्धा सप्टेंबर महिन्यात येणार हे कुठल्या आधारावर सरकार तर्फे बोलल्या जात होते? कोरोना ही व्हायरस ची बीमारी आहे याचा अंदाज शास्त्रज्ञ कसे काय लावू शकतात काय ही भविष्यवाणी करायला ही भूगर्भातील घडामोड आहे का? की ग्रह ताऱ्यांच्या वातावरणाची काही आपसात होणारी झुंज आहे का? याचे उत्तर कोणीही द्यायला तयार होणार नाही कारण भविष्यशास्त्रात सुद्धा याला काही आधार नाही आणि म्हणून एखाद्या भविष्यवक्त्यांचे हे काही भविष्य असू शकत नाही त्यामुळे कोरोनाची ही तिसरी लाट येणार म्हणजे जनतेला भ्रमीत करण्यासाठी व जनतेत भीती निर्माण करण्यासाठी सरकारचे हे छडयंत्र तर नाही ना? याबद्दल शंका यायला वाव आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा जाणीवपूर्वक आणल्या जात आहेत. लाटा यायला काही समुद्र आहे का ? विनाकारण इमारती सील करायच्या. याआधी देशात काही रोगराई आलीच नव्हती का ?, ते पुढे म्हणाले की राज्यात कुठेच काही बंद नाही. सगळं काही सुरू आहे. राजकीय पक्षांचे मेळावे सुरू आहेत. जन आशीर्वाद यात्रा सुरू आहेत. नारायण राणे आणि शिवसेनेच्या लोकांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. बाळासाहेबांच्या नावानं हडपलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या रोजच्या रोज येताहेत. त्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यांच्यासाठी लॉकडाऊन नाही. फक्त दहीहंडी किंवा सण-उत्सव आले की लॉकडाऊन लागतो. सणांमधूनच करोना पसरतो का?, असा संतप्त सवालही राजसाहेब ठाकरे यांनी केला. सरकारला जेवढं हवं आहे, तेवढं चालवायचं. बाकीच्यांना बंद करून ठेवायचं आणि जनतेला घाबरवून ठेवायचं. त्यामुळे दहीहंडीचा सण दणक्यात साजरा करण्याचा निर्णय मनसेने घेतल्याचे राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले होते.

कोरोना च्या लाटेत सर्वात जास्त कुणाचे नुकसान झाले असेल तर ते शहरी भागातील गोरगरीब कामगार मजूर, मध्यमवर्ग आणि छोटे छोटे दुकानदार , आजही कर्जाचे हप्ते फेडायचे आहे, दवाखान्यात औषधोपचार करायला पैसे नाही,रोजगार नाही आणि सरकार कडून कुठलीही मदत नाही पण पेट्रोल डिझेल चे भाव वाढवले गेले जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवले गेले त्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे जाताहेत पण सामान्य माणसाचे काय? यावर महाराष्ट्रातील आमदार खासदार व राजकीय नेते बोलायला खाली नाही फक्त राजकीय पोळ्या शेकण्यात व एकमेकांवर कुरघोड्या करण्यात राजकारणी मंडळी गुंतली आहे त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध करायचा नाही, त्याविरोधात मोर्चे काढायचे नाही.कुठलेही सण साजरे करायचे नाही कारण इकडे कोरोना आहे अशी भीती सरकार कडून जनतेमध्ये पसरवली जात आहे हा सरकार वरील मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा आरोप सत्य आहे हे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here