Home भद्रावती पोलीस वार्ता :- भद्रावती पोलीस स्टेशन च्या आवारात अवैध व्यावसायिकांची ये-जा?

पोलीस वार्ता :- भद्रावती पोलीस स्टेशन च्या आवारात अवैध व्यावसायिकांची ये-जा?

 

नवीन ठाणेदार गोपाल भारती यांनी केला कडक बंदोबस्त,

पानठेल्यावरील सुगंधित तंबाखू सुद्धा पोलिसांच्या रडारवर?

भद्रावती प्रतिनिधी :-

मागील काही वर्षापासून भद्रावती पोलीस स्टेशन चे तत्कालीन ठाणेदार पवार यांच्या सौम्य स्वभावगुणांमुळे भद्रावती शहरात शांतता नांदत होती शिवाय अवैध व्यावसायिकांना सुद्धा धाक असला तरी त्यांचा अतिरेक नव्हता अशी चर्चा असतानाच आता गडचांदुर वरून नव्याने रुजू झालेले ठाणेदार गोपाल भारती यांनी सर्व सूत्र हातामध्ये घेऊन अवैध व्यावसायिकांची तारांबळ उडवली असल्याने भद्रावती पोलीस स्टेशन मधे अवैध व्यावसायिकांची ये-जा वाढली असल्याची बातमी असून आता काय करायचंय? हा प्रश्न त्यांना पडला असल्याची चर्चा आहे.

ठाणेदार गोपाल भारती यांचा गडचांदुर येथील कारभार तसा चांगलाच म्हणावा लागेल पण भद्रावती हे शहर विविध सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेल शहर आहे इथे पोलिसांना मान सन्मान मिळतोच पण पोलीस प्रशासनाकडून सुद्धा येथील नागरिकांना ती अपेक्षा असते, कारण “सदरक्षनाय खलनीग्रहनाय” या पोलीस ब्रीदाचा पोलिसांनी सन्मान करावा म्हणजे मग आपोआप जनतेला न्याय मिळतो आणि रुजू झालेले ठाणेदार गोपाल भारती हे भद्रावतीकरांच्या या अपेक्षेला खरे उतरतील अशी सर्वाना अपेक्षा आहे.

शहरातील खर्रा पानठेले पोलिसांच्या रडारवर?

भद्रावती शहरात व तालुक्यात सुगंधित तंबाखू व त्यापासून खर्रा हा विषय महत्वाचा असून दररोज या व्यवसायातून लाखो रुपयाची उलाढाल होत असते त्यात पानठेलेवाल्याकडून दररोज हजारों ची सुगंधित तंबाखू ची विक्री होते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सुगंधित तंबाखू नेमका येतो कुठून आणि भद्रावती शहरात त्याचा व्यापारी कोण? याचा पोलीस नव्याने शोध घेत असून ठाणेदार गोपाल भारती यांच्या रडारवर पान ठेलेवाले सुद्धा असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here