मृतक महिलेच्या आईचे जावयासोबत गूप्तगू? मोठ्या मुलीचे बयान घेतल्यास हत्त्येचे रहस्य उलगडणार.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर शहरात रमाबाई नगर अष्टभुजा परिसरातील दिनांक ३ सप्टेंबरला प्रगती जितेंद्र उंदीरवाडे हिची धारदार सत्तूर शस्त्राने हत्त्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली असली तरी पोलिसांना अजूनपर्यंत मुख्य आरोपी यांचा शोध लागला नाही अशी परिस्थिती दिसत आहे, मात्र मृतक महिलेच्या आईचे जावया सोबत गूप्तगु असल्याने व मृतक प्रगती ही घर सोडून आपल्या मोठ्या मुलीसोबत दुसरीकडे शुक्रवारला जाणार असल्याने पती व आई यांनी मिळून प्रगतीची हत्त्या केली असल्याची खात्रीलायक माहिती असून जितेंद्र यांच्या नातेवाईकांकडून सुद्धा तीच गोष्ट समोर येत आहे पण पोलीस आरोपी जितेंद्र ला का पकडत नाही याबद्दल रमाबाई नगर मधील लोकांमधे तर्कवीतर्क लावले जात आहे.
मागील शुक्रवारी सकाळी जितेंद्रने प्रगती हिची झोपून असतांनाच सत्तूरने पाठीमागून वार केले व सासूला मी कोरोना ची लस घेण्यासाठी जात असल्याचे इतरांना सांग असे बजावले व सासूने आपल्या प्रेमी असलेल्या जावया ची पाठराखण करून वार्डातिल लोकांना जावई लस घ्यायला गेले असे सांगितले पण जेंव्हा प्रगतीला जखमी अवस्थेत असताना जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलेल्या लोकांना तिने माझ्या मुलीचा खून जावयानेच केल्याचा खुलासा केला पण रामनगर पोलीस स्टेशन मधे दुसऱ्या दिवशी मेमो गेला असता तेथील बायणा मधे तिने माझ्या मुलीने स्वतःच स्वताला वार करून जखमी केले असल्याचा जबाब दिला यावरून या प्रकरणात जावई आणि आई असल्याची दाट शक्यता आहे.
प्रगती उंदीरवाडे हिला पाठीमागून वार करण्यात आले त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रगती हिची हत्या करण्यात आल्याची माहिती उपस्थित लोकांना दिली. प्रगती ची सकाळी मोठी मुलगी कोचिंग क्लासेस करिता बाहेर पडल्यावर जितेंद्र ने डाव साधला व प्रगती ला झोपून असल्याचा फायदा घेत सपासप तीचेवर सत्तूर ने वार करून जखमी केले त्यावेळी खरे तर तो रामनगर पोलीस स्टेशन मधे जावून स्वताला सरेन्डर करणार होता पण पत्नी जिवंत असल्याची माहिती वार्डातिल एकाने दिल्यानंतर तो सरळ जिल्हा सामान्य रुग्णालयात गेला मात्र ही परिस्थिती पोलिसांना माहीत झाल्यानंतर सुद्धा आरोपी पती जितेंद्र उंदीरवाडे व त्या हत्त्येत सहभागी तिच्या आईला का कब्जात घेऊन चौकशी करत नाही? हा मोठा प्रश्न असून रमाबाई नगर मधील नागरिक महिला दहशत मधे असल्याचे चित्र आहे.