Home चंद्रपूर राजकीय कट्टा :- एका बापाची औलाद असेल तर पडळकर आरोप शीद्ध करून...

राजकीय कट्टा :- एका बापाची औलाद असेल तर पडळकर आरोप शीद्ध करून दाखव.

 

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आरोप करणाऱ्या आमदार पडळकर यांचा घेतला क्लास.

राजकीय कट्टा :-

राजकारणात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात पण निराधार आणि कुठलेही पुरावे नसताना केवळ ऐकीव बाबींवर विश्वास ठेऊन आणि जर कुणी राजकीय वैमनस्य समोर ठेऊन आरोप करत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. खरं तरं भाजप चे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा राजकीय इतिहास बघता लहान तोंडी मोठा घास असाच स्वभावगुण राहिला आहे, धनगर समाजाच्या सामाजिक मंचावरून वंचित बहुजन आघाडी आणि आता संधी साधून भाजपची चाटूगिरी करणाऱ्या आमदार पडळकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहे आणि तथ्यावर आधारित नसून केवळ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची बदनामी करण्याचे एक छडयंत्र असल्याची चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा असून स्वतः पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर पडळकर यांनी केलेल्या आरोपावरून सडेतोड उत्तर देऊन “एका बापाची औलाद असेल तर पडळकर माझ्यावर लावलेले आरोप शीद्ध करून दाखव”. असे आव्हान केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवण्याचा संकल्प पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आपला तो निर्णय सिद्ध करून दाखवला व पाच वर्षापासून दारूबंदी च्या चक्रव्यूहात सापडलेल्या जनतेला त्यांनी एक प्रकारे त्यांचा अधिकार मिळवून दिला. कारण जनतेने काय खावे व काय पिऊ नये हे सरकारने ठरवायचे नसते आणि विशेष म्हणजे कुठलेही ठोस कारण नसताना चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी मागील सरकारने केली तो एक प्रकारे येथील चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर तो निर्णय थोपवल्या गेला असल्याची भावना जनता व्यक्त करीत होती, कारण दारूबंदी ही फक्त कागदावर होती आणि त्यापासून चोर बदमाश गुंड यांचाच कारभार चालायचा त्यामूळे कित्तेक गुंडांच्या आपसी संघर्षात हत्त्या झाल्या हा इतिहास आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जेंव्हा दारूबंदी उठवली तेंव्हा अवैध दारू विकणाऱ्या माफियांची मोठी पंचायत झाली कारण त्यात काही राजकीय मंडळी आपले उखळ पांढरे करीत होते व गुंडगिरी करणाऱ्यांनी संघटित गुन्हेगारीला जन्म देऊन जिल्ह्यात नवा अध्याय सुरू केला होता. कारण ज्यांचे खायचे वांदे होते ते चार चाकी गाडीवर बसायला लागले होते आणि मोठमोठ्या प्रापर्टा विकत घेऊन त्यांनी बंगले बांधले आणि ते राजकीय आखाड्यात उतरले होते आता तेच दारूबंदी उठवली तर किंचाळत आहे आणि यामागे काय गुपित आहे हे चुकीच्या पद्धतीने विरोधकांना सांगून जिल्ह्यातील दारूबंदी विषयाला बळ देत आहे. पण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात उठवलेली दारूबंदी ही चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक हिताला चालना देणारी आहे, त्यामुळे पडळकर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर केलेले आरोप हे राजकीय वैमनस्यातून केलेले आहे हे सिद्ध होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here