Home राजकारण खळबळजनक :- धनंजय मुंडेच्या पत्नी करुणा शर्मांच्या गाडीत बंदूक सापडल्याने खळबळ,

खळबळजनक :- धनंजय मुंडेच्या पत्नी करुणा शर्मांच्या गाडीत बंदूक सापडल्याने खळबळ,

 

धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबांचा घातपात करण्याचा डाव असण्याची शक्यता?

न्यूज नेटवर्क :-

सद्ध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर नानाविध आरोप लावून सामाजिक माध्यमावर खळबळ उडवून दिली असताना आता तर चक्क त्यांच्या गाडीत बंदूक सापडल्याने खळबळउडाली आहे.

खरं तर करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या तथाकथित पत्नी असून आज त्या परळी येथे पत्रकार परिषद घेणार होत्या. यावेळी अनेक विषयांची पोलखोल करण्याचा इशारा त्यांनी सामाजिक माध्यमातून दिला होता. मात्र, करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांचा मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रसंगावरून परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.

Previous articleब्रेकिंग :- निजीकरण के मुद्दे पर मोदी सरकारपर हो शकता है देशद्रोह का अपराध दर्ज.
Next articleराजकीय कट्टा :- एका बापाची औलाद असेल तर पडळकर आरोप शीद्ध करून दाखव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here