Home धक्कादायक धक्कादायक :- ‘घरी सोडतो’ असं म्हणत एका 14 वर्षीय मुलीचं अपहरण करून...

धक्कादायक :- ‘घरी सोडतो’ असं म्हणत एका 14 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार.

 

८ आरोपींना अटक. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील घटना.

न्यूज नेटवर्क :-

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात माणुसकीला लाजवेल अशी एका 14 वर्षीय मुलीवर गैंगरेप झाल्याची गंभीर घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. त्या आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची आहे.

पुणेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला एक 14 वर्षीय मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी पुणे रेल्वेस्टेशन जवळ आली होती. मात्र तिचा मित्र भेटण्यासाठी आला नाही.दरम्यान, मुलगी एकटी असल्याचं पाहून एका रिक्षावाल्याने घरी सोडतो असं म्हटलं. व मुलीला रिक्षात बसवून रिक्षा चालकाने तिला भलतीकडेच नेलं. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बोलावून दोन दिवस विविध ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलं.

या संदर्भात पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत याप्रकरणी अधिक माहिती दिली. पाटील म्हणाल्या, “मुलीच्या वडीलांनी दुसऱ्या दिवशी मुलगी हरवल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब घेतला. तिच्या जबाबातून आठ जणांना पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपींना न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.”

पीडित मुलीवर पुणेच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मुलीची आणि आरोपीची कुठलीही पूर्वीची ओळख नव्हती. तर आरोपींपैकी काही रिक्षाचालक आहेत, तर 2 जण रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

Previous articleखळबळजनक :- धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी,
Next articleब्रेकिंग न्यूज :- राज्यात तिसऱ्या लाटेच्या आगमनाने लॉकडाऊन लागणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here