Home नागपूर ब्रेकिंग न्यूज :- राज्यात तिसऱ्या लाटेच्या आगमनाने लॉकडाऊन लागणार.

ब्रेकिंग न्यूज :- राज्यात तिसऱ्या लाटेच्या आगमनाने लॉकडाऊन लागणार.

 

नागपूर मधे येत्या काही दिवसात लॉकडाऊनची घोषणा.

न्यूज नेटवर्क :-

राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून तिसऱ्या लाटेची संभावित शक्यता बघता पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील दुसऱ्या लाटेत हॉट स्पॉट असलेल्या नागपूर शहरात काही काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या तीन ते चार दिवसात नागपूरमध्ये लॉकडाऊन लावण्याचं सूतोवाच नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे नागपूरला पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये जावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होती मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्या.

खरं तरं आपण नेहमी म्हणत आहो की दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने राज्यात नागपूर सह अनेक जिल्ह्यात शिरकाव केला त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध सरकारतर्फे लावले जाणार आहेत.

कोरोना ची तिसरी लाट कशी असेल हे सध्या गूलदस्त्यात असले तरी लॉकडाऊन चे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. असे नागपूर चे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले राऊत यांनी यावेळी विकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यताही वर्तवली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि दुकानाच्या वेळा कमी करण्याचे संकेतही त्यांनी दिले. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. मात्र, येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेऊन निर्बंध लावण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here