Home भद्रावती शेतशीवार:- बंधाऱ्याचे अर्धवट काम करून पळालेल्या कंत्राटदारावर दंड

शेतशीवार:- बंधाऱ्याचे अर्धवट काम करून पळालेल्या कंत्राटदारावर दंड

 

ग्रामपंचायत नंदोरीचे सदस्य किशोर उमरे यांनी केली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार.

भद्रावती प्रतिनिधी :-

राज्यात शासनाने राबवलेल्या चांदा ते बांदा योजने अंतर्गत भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शिर नदीवर गेटेड साठवण बंधारा सन २०१९ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या बंधार्याचे कंत्राट सोपान मारोती केंद्रे या कंत्राटदारला देण्यात आले होते. या कंत्राटदाराने कामाला सुरवात केली होती. मात्र कोरोंना विषाणूचे कारण पुढे करत हा कंत्राटदार बंधार्याचे काम अर्धवट सोडून पसार झाला. याबाबत नदोरी ग्रामपंचायत चे सदस्य किशोर उमरे यांनी जलसंपदा ‘लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांना निवेदनामार्फत तक्रार केली होती. ना. जयंत पाटील यांनी तात्काळ दखल घेत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाकडे ही तक्रार वर्ग करून कंत्राटदारला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. काम सुरू न केल्यास प्रतिदिनं १००० रुपये दंड आकारणार असल्याचे पत्र सुद्धा देण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाचा महत्वकांशी प्रकल्प चांदा ते बांधा योजना २०१७-१८ अन्वये गेटेड साठवण बंधारा नंदोरी येथे रु. १९१. ४२ किमतीत प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रशासकीय मान्यतेच्या अनुषंगाने जलसंधारण विभागामार्फत शासनाने महाटेंडर या संकेतस्थळावर दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी बंधार्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुषंगाने सोपान मारोती केंद्रे रा. मालाकोली ता लोहा, जि. नांदेड यांचे दर निम्न १४.०१ कमी दराने असल्यामुळे निविदा प्रक्रिया पार पाडून सोपान केंद्रे यांना १२ महीने काम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार बंधारा बांधकामासाठी लागणारे साहित्य ही कंत्राटदाराने २० जून २०१९ रोजी आणून खोदकामाला सुरुवात केली होती. पाच दिवसाने पाऊस आल्यामुळे काम बंद करण्यात आले. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२० पुन्हा बंधारा बांधकामास सुरुवात केली. २५ मार्च २०२० को १२ व ल, राफट व त्यावरील बॉडल काम २० मीटर पर्यन्त करून बंद केले. विभागीय कार्यालयाकडून कामाचे प्रथम चालू देवक ३७.०६ लाख रुपये देण्यात आले. असे असतानाही कंत्राटदारांनी काम पूर्ण केले नाही.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव.

चांदा ते बांदा योजने अंतर्गत गेटेड साठवण बंधाऱ्याचे काम अर्धवट सोडून पसार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत नंदोरीचे सदस्य किशोर उमरे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना. जयंत पाटील यांना तक्रार केली होती. याची दखल घेत मृद व जलसंधारण विभागाने चांदा ते बांदा योजनेच्या कामाबाबत करारबद्ध कंत्राटदार सोपान मारोती केंद्रे यांनी विहित मुद तीत काम पूर्ण न केल्यामुळे कामाचा करारनामा रद्द करण्यात आला असून कंत्राटदार सोपान केंद्रे याला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

कंत्राटदारांने अर्धवट काम करून सोडून गेल्याने ग्रामपंचायत नंदोरी चे सदस्य किशोर उमरे यांनी ग्रामपंचायत च ठराव घेऊन जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना. जयंत पाटील यांना तक्रार केली होती. त्यानुसार ना. जयंत पाटील यांनी संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करून संबंधित कंत्राटदारा वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जलसंपदा विभागाकडून त्या कंत्राटदारला अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याच्या वारंवार सुचना देण्यात आल्या होत्या बांधकामास सुरवात न केल्यास प्रतिदिन १००० हजार रुपये दंड आकरण्यात येईल असे पत्र देण्यात आले होते. मात्र याकहे कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने त्याच्या सुरक्षा ठेव के अतिरिक्त सुरक्षा ठेव व देयकातून रकम १४ लाख ५८ हजार १४३ रुपयातुन ०३ जून २०२० ते दि. २८ न जून २०२१ पर्यन्त ३९० दिवसाचे प्रतिदिन १००० हजार रुपये प्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये कपात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here