Home ब्रम्हपुरी गोंदिया चंद्रपूर बल्लारशा लोकल ट्रेन गाडी पूर्ववत सुरू करा.

गोंदिया चंद्रपूर बल्लारशा लोकल ट्रेन गाडी पूर्ववत सुरू करा.

अन्यथा 15 सप्टेंबर रोजी सौदंड रेल्वे चौकी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू- भाकप चा इशारा.

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :–

चंद्रपूर,भंडारा,गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या पॅसेंजर व लोकल ट्रेन गाड्या त्वरित सुरू करा अन्यथा 15 सप्टेंबर 2021 रोजी सौंदड रेल्वे चौकी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदक्ष तथा ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख कामगार संघटनेचे नेते कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.

कोरोना संसर्गाच्या महामारीने मागील दीड वर्षा पासून अनेक लोकल आणि पॅसेंजर गाड्या रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत.मात्र काही विशेष गाड्या सुरू आहेत. त्यातील काही गाड्यांचे थांबेच दिले गेले नाही.तर अनेक लाभार्थी सवलती पासून वंचित ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे पॅसेंजर व लोकल ट्रेन गाड्या सुरू करण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष चंद्रपूर, भंडारा,गोंदिया व गडचिरोली जिल्हा च्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदक्ष तथा ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख आय टक कामगार संघटनेचे नेते कॉ.विनोद झोडगे, भाकप चे राज्य सचिव मंडळ सदक्ष कॉ.शिवकुमार गणवीर ,चंद्रपूर जिल्हा सचिव कॉ. प्रा.नामदेव कनाके,राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. ड्रा.महेश कोपुलवा र ,हौंसलाल रहांगडाले,गडचिरोली जिल्हा सचिव कॉ.देवराव चवळे,गोंदिया जिल्हा सचिव कॉ.मिलिंद गणवीर,भंडारा जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके हे करणार आहेत.
या आंदोलनात चंद्रपूर जिल्हा सह ब्रम्हपुरी विधान सभा शेत्रातून जास्तीत जास्त संख्येने जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. विनोद झोडगे, कॉ.संतोष दास, कॉ.राजू गैन वार,प्रकाश रेड्डी, कॉ.प्रदीप चीता डे,ब्रम्हपुरी तालुका प्रमुख कॉ.विनोद राऊत,सिंदेवाही तालुका प्रमुख श्रीधर वाढई,वनिता कुंठावार, कुंदा कोहपरे, बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे,सावली तालुका सचिव मनोज घोडमारे,यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here