Home धक्कादायक बापरे बाप! एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांचा नाव उलटून मृत्यु.

बापरे बाप! एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांचा नाव उलटून मृत्यु.

 

दशक्रिया आटोपून महादेवाच्या दर्शनासाठी नावेमधे गेलेल्या बहीण, भाऊ, जावई यांना जलसमाधी.

अमरावती न्यूज नेटवर्क :-

कुटुंबातील मृत सदस्यांचा दशवीधी कार्यक्रमासाठी गाडेगाव येथील मटरे कुटुंबीय दशक्रियेच्या विधीसाठी वर्धा नदीवर आले होते. काल दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात असताना नियतीच्या मनात काय होते कोणास ठावूक? पण अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. यापैकी सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केलीजात आहे.

हे सर्वजण असल्याची प्राथमिक माहिती असून तिघांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरु आहे. आता बचाव पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे.

Previous articleमाजरी-भद्रावती रत्याच्या रेल्वे गेटवरुन बुधवार पर्यंत पुन्हा वाहतूक बंद.
Next articleखळबळजनक :- नकली नोटांच्या छापखान्यावर नाशिक पोलीसांची धाड. तूम्हच्याकडे पण येऊ शकतात नकली नोटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here