Home महाराष्ट्र खळबळजनक :- नकली नोटांच्या छापखान्यावर नाशिक पोलीसांची धाड. तूम्हच्याकडे पण येऊ शकतात...

खळबळजनक :- नकली नोटांच्या छापखान्यावर नाशिक पोलीसांची धाड. तूम्हच्याकडे पण येऊ शकतात नकली नोटा

 

लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्याने सुरु केला थेट नकली नोटांचा छापखाना.

नाशिक नेटवर्क न्यूज :-

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून शहरात कलर प्रिंटिगचा बिझनेस बंद असल्याने येथे चक्क नकली नोटांचा छापखाना सुरु केला असल्याने नाशिक पोलिसांनी धाड टाकून पर्दापाश केला आहे. यावेळी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव जवळील विंचूरपर्यंत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे, आरोपींनी आतापर्यत लाखो नकली नोटा छापल्या आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या नकली नोटांच्या छापखान्यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामध्ये लॉकडाऊनमुळे नाशिकमधील काही तरुणांचा रोजगार गेला. कलर प्रिटिंगचा व्यवसायही बंद झाला. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी चक्क नोटांचा छापखाना सुरु केला. आहे. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या बनावट नोटा छापत होते. गेले 3 महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचे काम या तरुणांकडून सुरु होते. विशेष म्हणजे नोटा छापण्याचे तसेच त्या बाजारात आणण्याचे काम अगदी नियोजनपणे केले जात होते. 3 महिन्यापासून दैनंदिन व्यवहारात नकली नोटा आणल्या जात होत्या. पण, हा प्रकार समोर यायला अधिक वेळ लागला नाही. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना आमच्याकडे नकली नोटा येण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. त्यामुळे या संदर्भात पोलीसांकडे आरोपींच्या कारनाम्याची चर्च करण्यात आली.

या कारवाईत नाशिक पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली आहे. कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद असल्याने नकली नोटा छापण्याचं धाडस अटक केलेल्या लोकांनी केलं आहे. याशिवाय राजकीय व्यक्तीचा यात काही हस्तक्षेप आहे का? याचा देखील अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Previous articleबापरे बाप! एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांचा नाव उलटून मृत्यु.
Next articleराजकीय कट्टा:- सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नितीन गडकरी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here