Home राष्ट्रीय राजकीय कट्टा:- सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नितीन...

राजकीय कट्टा:- सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नितीन गडकरी?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी धुमील झाल्याने भाजप घेणार नवीन पवित्रा? फेसबुकच्या nitin gadakari fan club वरून हुंकार.

राजकीय कट्टा:-

देशात सद्ध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण निर्णयाने जनता संतापली असून साध्वी उमा भारती यांनी म्हटल्या प्रमाणे नरेंद्र मोदी विकास पुरुष नाही तर विनाश पुरुष आहे ही गोष्ट आता स्वतः भाजप मधील नेते कार्यकर्ते सुद्धा म्हणायला लागले आहे. देशाची मालमत्ता खाजगी लोकांच्या हातात देऊन देश कंगाल करण्याचे धोरण पाहता जर येणाऱ्या सन २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार केले तर भाजपचा मोठा पराभव होण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असल्याने देशातील ६० टक्के शेतकरी जनता ही विरोधातगेली तर भाजप ला सत्तेपासून दूर व्हावे लागणार आहे त्यामुळे भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नितीन गडकरी यांना करू शकतात हे आता स्पष्ट व्हायला लागले आहे.

राजकीय सत्तेची हाव नसलेले पण सत्तेचा सदुपयोग करून प्रचंड विकास कामे करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सद्ध्या देशात आलेल्या अराजकतेला संपवू शकतात व नवी क्रांती निर्माण करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आहे कारण त्यांची प्रत्त्येक कामात दूरदृष्टी असते.कुठलंही काम निष्ठापूर्वक केलं तर ते चिरकाल टिकते आणि समोरच्या पिढीला काय हवंय हे ते हेरून आहे. त्यांचे गाईच्या शेणापासुण कलर पेंट ते बायोडिझेल व इलेक्ट्रिक कार वैगेरे चे प्रोजेक्ट बघता या देशाला पंतप्रधान म्हणून त्यांची योग्य निवड होऊ शकते.

सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आवडीचा नेता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्व प्रादेशिक राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळचे हितसंबंध असलेले नेते आहेत.ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी देशातील सर्व राज्याचा व तेथील राजकीय परिस्थितीचा चांगला अभ्यास केला व जर केंद्रात भाजपची काठावर बहुमत शीद्ध करायची वेळ आली तर नितीन गडकरी यांच्या शब्दांखातर अनेक पक्षाचा भाजपला पाठिंबा मिळू शकतो त्यामुळे येणाऱ्या सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला नितीन गडकरी शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

राज्यातील चेहरे बदलले तर केंद्रात का नाही?

भाजपने आपल्या गुजरात राज्यातील मुख्यमंत्र्यासोबतच इतर राज्यातील मुख्यमंत्री बदलले तर मग केंद्रात बदल का नाही हा प्रश्न नितीन गडकरी fan club या फेसबुक आयडी वरून विचारण्यात आला अर्थात भाजप मधे अंतर्गत बदलाचे वारे वाहायला लागले असून संघ परिवारातील एक सशक्त नेता म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहल्या जात आहे त्यामुळे “राजतिलक की करो तयारी आ रहे है नितीन गडकरी ” हे घोषवाक्य ऐकायला येणाऱ्या काळात नक्की मिळेल अशी शक्यता वाटायला लागली आहे.

Previous articleखळबळजनक :- नकली नोटांच्या छापखान्यावर नाशिक पोलीसांची धाड. तूम्हच्याकडे पण येऊ शकतात नकली नोटा
Next articleधक्कादायक :- राज्यातील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये 80 टक्के परप्रांतीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here