Home महाराष्ट्र धक्कादायक :- राज्यातील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये 80 टक्के परप्रांतीय.

धक्कादायक :- राज्यातील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये 80 टक्के परप्रांतीय.

 

साकीनाका बलात्कार प्रकरणी मनसे आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांची नोंद ठेवायचे दिले आदेश.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात येणाऱ्या परप्रांतियांची माहिती ठेवावी अशी मागणी करत आहेत. मात्र, त्याकडे सत्ताधाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. पण आता साकीनाका घटनेनंतर राज्यकर्त्यांचे डोळे उघडल्याचे दिसत आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे राज्यातील परप्रांतीयांची नोंद होणार आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत.

खरं तर महाराष्ट्रात परप्रांतीय कोठून येतात? ते कोठे वास्तव करतात? याची कोणतीच माहिती पोलीस प्रशासनाकडे नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवे अशी मागणी राजसाहेब ठाकरे यांनी सतत केली होती. कालांतराने तो मुद्दा बाजुला पडला. परंतू साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याने मनसेच्या त्या मागणीला विशेष महत्व होत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकीनाका बलात्कार प्रकरणी समजले असावे असे वाटत आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयावर भाजपने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. परंतु आता राज्यात महिलांवर होणाऱ्या 80 टक्के अत्याचारामागे परप्रांतीय गुन्हेगार आहेत, असा दावा मनसेने केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचवेळी मनसेकडून हा दावा करण्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेला बळ मिळालं आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेबाबत गृहमंत्र्यांना निवेदन देऊन पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here