Home चंद्रपूर सावधान ! जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात बनावट पद भरती?

सावधान ! जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात बनावट पद भरती?

 

बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक, तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षऱ्यासह नियुक्ती पत्र.

चंद्रपूर प्रतिनिधी : –

सरकारी नौकरी लागावी म्हणून वाट्टेल ते करण्याची सुशिक्षित बेरोजगार युवकांची तयारी असते त्याच संधीचा फायदा उचलून काही भामटे हे सावज शोधतच असतात अशाच प्रकारची घटना चंद्रपूर जिल्हापरिषद मधे घडली असून बल्लारपूर शहरातील ब्रिजेशकुमार बैधनाथ झा याने बल्लारपूर शहरातील युवकांना जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमीष दिले व नौकरी मिळणार या आशेने युवकांनी झा यांना लाखो रुपये सुद्धा दिले.

झा यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागातील वर्ग 3 च्या कर्मचारी व ४ या पदाचे तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचे नियुक्ती आदेश त्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना दिले.

आपल्याला शासकीय नोकरी मिळाली ती सुद्धा जिल्हा परिषद चंद्रपूरला याचा त्या युवकांना आनंद झाला मात्र तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जास्त काळ टिकणारा नव्हता. 9 सप्टेंबरला युवक नियुक्ती आदेश घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सेठी यांच्याकडे गेले असता सदर फसवणुकीची बाब उघडकीस आली.तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तय करण्यात आले असल्याची माहिती समोर आली.

जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी झा याच्याविरुद्ध भादंवी ४६५, ४६८, ४७१ आणि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, नोकरीचे बनावट आदेश प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून युवक-युवतींनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे.

Previous articleओबीसी ला राजकीय आरक्षण संदर्भातील राज्य शासनाचा निर्णय असा झाला?
Next articleचिंताजनक :- महागाईच्या आगीत गरिबांचे जगणे झाले मुश्किल, अच्छे दिन च्या नावावर आले वाईट दिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here