Home महाराष्ट्र आरक्षण कट्टा :- देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस आहेत...

आरक्षण कट्टा :- देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस आहेत काय?

 

ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा.हरी नरके यांचा ओबीसी आरक्षण मुद्यावरून भाजपच्या राजकारणावर टोला.

ओबीसी आरक्षण कट्टा :-

भाजप नेते फडणवीस व शेलार सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी निकालाबाबत जो प्रचार करीत आहेत, तो पाहता त्यांच्या लॉ च्या पदव्या बोगस असाव्यात अशी शंका येते. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राज्यघटनेच्या कलम १४२ खाली दिलेला असल्याने तो सर्व देशाला लागू झालेला आहे. त्यानुसार सर्व देशातले ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. (पहा: निकालपत्र, परि.२६ व भारतीय संविधान, कलम १४२) ही वस्तुस्थिती दडवून हे दोघेही या निकालाबाबत वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. फक्त महाराष्ट्रातले आरक्षण गेले असून बाकी सर्व राज्यातील आरक्षण कायम असल्याचे ते सांगत असतात.
खरं तर या दोघांनाही न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कोर्टात खेचायला हवे. वकिलीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना जी माहिती असते ती यांना नसेल तर त्यांच्या वकिलीच्या पदव्या बोगसच असणा असा सणसणीत टोला भाजपच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांना त्यांनी लावला.

ते पुढे म्हणाले की भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांचा हा खोटेपणा उघडा पाडण्याऐवजी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मौन बाळगून बसलेत. यामागे त्यांचे अज्ञान आहे की ओबीसीबाबतची उदासीनता? असा प्रश्न तमाम ओबीसी मतदार त्यांना विचारीत असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here