डाव्या हाताची शीर कापल्यानंतर ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतला.
न्यूज नेटवर्क :-
राज्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून त्यात महिलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसत आहे अशाच प्रकारची आत्महत्या सांगवी येथील योगा प्रशिक्षक असलेल्या महिलेनं राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन केली असून हा धक्कादायक प्रकार सोमवारी (20 सप्टेंबर) रोजी उघडकीस आला आहे. विशाखा दीपक सोनकांबळे (वय 37, रा. सांगवी) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान, महिलेनं आत्महत्या का केली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा या त्यांचे पती दीपक तसेच 10 वर्षांचा मुलगा व 6 वर्षांची मुलगी यांच्यासोबत सांगवी येथे भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री त्यांचे पती दीपक हे मुलगा व मुलगी यांच्यासह घराच्या हॉलमध्ये झाेपले होते. त्यानंतर विशाखा यांनी बेडरुममध्ये डाव्या हाताची शीर कापली. त्यानंतर ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी विशाखा यांचा पती दीपक हे झोपेतून जागे झाले असता बेडरुममध्ये विशाखा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. यांनतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विशाखा यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच विशाखा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सोनकांबळे यांच्या घरातील डायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
विशाखा ह्या फार गुणी होत्या.
विशाखा सोनकांबळे या योगा प्रशिक्षक म्हणून योगाचे क्लास घेत होत्या. तसेच पिंपरी-चिंचवड शहर स्तरावर विवाहित महिलांसाठी झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत त्यांनी सौंदर्यवती म्हणून बहुमान पटकावला होता. तसेच इतर सामाजिक कार्यातही त्या पुढाकार घेत असत.त्यामुळे त्यांच्यात चांगले गुण होते पण त्यांनी आत्महत्या सारखी टोकाची भूमिका का घेतली हे सध्या कळले नाही.