Home भद्रावती संतापजनक :- दहा दिवस उलटून सुद्धा आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना नाही मिळाली...

संतापजनक :- दहा दिवस उलटून सुद्धा आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना नाही मिळाली मदत.

 

माणुसकी हरवलेल्या लोकप्रतिनिधींनी फिरवली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांकडे पाठ.

भद्रावती प्रतिनिधी :-

शासनाच्या शेतकरी विरोधी नितीमुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव आत्महत्या कराव्या लागतात पण जे लोकप्रतिनिधी शासन आणि प्रशासनाकडून शेतकरी हिताच्या वल्गना करतात, शेतकरी आत्महत्यावर मंत्रिमंडळात खूपसार्‍या चर्चा केल्या जातात, शेतकरी आत्महत्यावर मुख्यमंत्री, कृषी मंत्री चिंता व्यक्त करतात मात्र कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधीकडून आत्महत्या करणाऱ्या मृतक शेतकरी कुटुंबीयांची साधी भेट ही घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमधे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली माणिक सदाशिव बागेसर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे ६ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी चंदनखेडा शेत शिवारातील प्रकाश निमजे नामक शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.दोन दिवस शेतकऱ्याचा शोध घेतल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला ही वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली मात्र संबंधित कार्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा करत दुर्लक्ष केले,

आज १० दिवसाचा कालावधी लोटला असतानाही या मृतक शेतकरी कुटुंबियांच्या परिवाराकडे लोकप्रतिनिधी पाठ फिरवली असून या प्रकारामुळे चंदनखेडा गावात लोकप्रतिनिधी बाबत असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. हे लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीपुरते सामान्य नागरिकांना हाताशी धरतात निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींना कुणाचेही सोयरसुतक नसल्याचे या शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणातून दिसून येत आहे. यावर आता सुज्ञ नागरिकांनी चिंतन करण्याची गरज आहे.

Previous articleदरेकर, तुम्ही फडणवीसांच्या बुडाचे मुके घेता काय ?
Next articleधक्कादायक :- सौंदर्यवती स्पर्धेत सौंदर्यवती म्हणून बहुमान मिळविणाऱ्या महिलेची आत्महत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here