Home धक्कादायक दरेकर, तुम्ही फडणवीसांच्या बुडाचे मुके घेता काय ?

दरेकर, तुम्ही फडणवीसांच्या बुडाचे मुके घेता काय ?

 

वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी संपादकीय लेखातून घेतले भाजप नेत्यांना चिमटे.

न्यूज नेटवर्क :-

देशात आणि राज्यात प्रसारमाध्यमे हे सत्ताधारी नेत्यांच्या हातातील बाहुले बनले असल्याचे चित्र असतांना देशपातळीवर रविशं कुमार सारखे पत्रकार आणि राज्यात निखिल वागळे यासारखे अनेक पत्रकार हे सत्ताधाऱ्यांना पुरून उरतात आणि जे सरकारचे निर्णय आहे त्याबद्दल ते बोलतात आणि लिहितात अगदी त्याच धर्तीवर वज्रधारी चे संपादक दत्तकुमार खंडागळे यांची लेखणी सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात चालत असून त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानाचे पोस्टमार्टम केले आहे.

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टिका करताना त्यांनी तमाम स्त्री जातीचा अवमान केला आहे. जेष्ठ लावणी सम्राद्नी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात बोलताना दरेकरांची जीभ घसरली आणि त्यांनी विकृतीची पिचकारी टाकली आहे. “राष्ट्रवादीचे नेते रंगलेल्या गालाचे मुके घेतात !” असे हलकट प्रवृत्तीचे वक्तव्य प्रविण दरेकरांनी केले आहे. एकमेकांच्या राजकीय हाणामारीत तुम्हाला कशी मारायची तशी मारा. एकमेकांचे कपडे फाडा, उणी-दुणी काढा, टिका-टिप्पणी करा पण तुमच्या राजकारणासाठी कुठल्या वर्गाचा अवमान, विटंबना, टिंगल व टवाळी का करता ? दरेकरांचे वक्तव्य एकट्या सुरेखा पुणेकरांचा अपमान करणारे नव्हे तर तमाम स्त्री जातीचा अपमान करणारे आहे. या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून ते काय मानसिकतेचे आहेत ? हे लक्षात येते. महाराष्ट्रात साकीनाका बलात्कार प्रकरणाचे राजकीय भांडवल करणा-या भाजपाच्या नेत्यांनी दरेकरांच्या विकृतीवरही बोलावे. या विकृतीचाही प्रामाणिकपणे निषेध करावा. मागे एकदा गणेश पांडे नामक भाजपाच्याच भामट्याने एका भाजप कार्यकर्तीचा विनयभंग केला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना तो प्रकार घडला होता. मराठन बहूत अच्छी दिखती है !” असे वक्तव्य गणेश पांडे नावाच्या भामट्याने करून सदर महिला कार्यकर्तीला छेडले होते. त्यावर नेहमीप्रमाणे या संस्कृती रक्षकांची दातखिळी बसलेली होती हे नको सांगायला. सुरेखा पुणेकरांना उद्देशून इतक्या खालच्या पातळीचे वक्तव्य करणारे प्रविण दरेकर हे महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहाचे नेते आहेत. वरिष्ठ सभागृहाचा नेता इतक्या कनिष्ठ मनोवृत्तीचा कसा काय असू शकतो ? हा प्रश्न पडला आहे.

दरेकरांनी तमाम महिलांचा अवमान केला आहे. सुरेखा पुणेकर या लावणी करतात. लावणी करताना मेकअप आलाच. हल्ली मेकअप सर्वच बायका मेकअप करतात. दरेकरांनी घरी चौकशी केली तर हे वास्तव त्यांना समजेल. पण त्यांच्या वक्तव्याचा रोख हा सुरेखा पुणेकरांच्या नाच-गाण्याकडे व त्यांनी केलेल्या राष्ट्रवादी प्रवेशाकडे होता म्हणूनच ते तसे बोलले. एखादी महिला नाच-गाणे करेल, एखादी, मुजरा करेल, भले एखादी महिला वेश्याही असेल म्हणून तिची विटंबना करण्याचा अधिकार कुणाला नाही. तिची अवहेलना, टवाळी व टिंगल करण्याचा अधिकार प्रविण दरेकरांना कुणी दिला ? कुठलीही, कसलीही महिला असली तरी तीचे स्वतंत्र अस्तित्व आहे, तिचे स्वत्व आहे, स्त्रीत्व आहे. तिचा तिला आत्मसन्मान आहे. ती काय काम करते ? कशी वागते ? गालावर रंग लावते की आणि काय लावते ? याच्या उका-पाकाळ्या करण्याचा दरेकरांना काय अधिकार ? तिचा जाहिर अवमान करण्याची हिम्मत दरेकरांना कशी झाली ? राज्याच्या वरिष्ठ सभागृहाच्या नेत्याचे हेच काम आहे का ? कोण कुठले मुके घेतो ? कोण कशाचे मुके घेतो ? याच्याच उका-पाकाळ्या दरेकर करतात काय ? राष्ट्रवादीवाले रंगलेल्या गालाचे मुके घेतात असं सांगणा-या दरेकरांनी ते कशाचे मुके घेतात ? ते ही जाहिर करावे. दरेकर फडणवीसांच्या बुडाचे मुके घेतात की आणखी कशाचे घेतात ? ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावे.

प्रविण दरेकरांच्या मनात स्त्रियांच्याप्रती काय भावना आहे ? हे या निमित्ताने दिसून आले. स्त्री ला देवता माणण्याची संस्कृती सांगणा-या पक्षातली ही प्रवृत्ती आहे. “यत्र नार्यस्तो पुज्यते, तत्र देवत: रम्यन्ते” अशी संस्कृत सुभाषित भाषणातून फेकणा-या संघाच्या नेत्यांची या बाबत काय भूमिका आहे ? साकीनाका बलात्काराचे राजकारणासाठी भांडवल करणा-या भाजपाने दरेकरांच्या वक्तव्याबाबत महाराष्ट्राची जाहिर माफी मागायला हवी. मनसेत असताना मुंबै बँकेत घोटाळा केल्याच्या आरोपाने तोंड रंगवून भाजपात आलेले दरेकर आतले दात दाखवून गेले. एखाद्या नाच-गाणे करणा-या स्त्री बाबत त्यांची असली मानसिकता कशी काय असू शकते ? भाजपात अनेक स्त्रीया काम करतात. सिनेमातल्याही अनेक स्त्रीया भाजपात आहेत. स्वत: फडणवीसांची पत्नी असलेल्या अमृता फडणवीसही गाणी गाणे करतात. स्मृती इराणी, हेमा मालिनी, कंगना रानौत अशा अनेक स्त्रीया भाजपात आहेत. दरेकरांनी एकट्या सुरेखा पुणेकरांचाच अवमान नाही केला तर भाजपातल्या या स्त्रीयांचाही हा अवमान केला आहे. सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत गेल्या म्हणजे मुके द्यायला गेल्या काय ? दरेकरांच्या मनात असली विकृती येतेच कशी ? एखाद्या महिलेबाबत असले हलकट वक्तव्य आणि विचार ते कसा काय करू शकतात ? खरतेर दरेकरांची असली मानसिकता असेल तर ते वरिष्ठ सभागृहाला गालबोट आहेत. वरिष्ठ सभागृहाच्या परंपरेला गालबोट लावणारी ही प्रवृत्ती भाजपाच्या संस्कृतीत कशी काय बसते ? दरेकरांनी केलेले हेच वक्तव्य एखाद्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्याने केले असते तर भाजपवाल्यांनी अवघा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता. बुडाचे ढोल बडवत बडवत निषेेध नोंदवला असता. स्त्रीयांच्या प्रश्नावर आक्रमक होणा-या चित्राताईंना दरेकरांचे वक्तव्य खटकले नाही काय ? त्यांना दरेकरांच्या वक्तव्याचा राग आला नाही काय ? असल्या विषयात पक्षाच्या व गट-तटाच्या चौकटी पाहून बोलणे म्हणजे शुध्द सोंग आहे. चित्राताईंना जर स्त्रीयांच्या सन्मानाची चाड असेल तर त्यांनी दरेकरांची मोठी बहिण या नात्याने त्यांचे थोबाड रंगवून संस्कार द्यावेत. स्त्रीयांचा सन्मान कसा राखावा, त्यांचा आदर कसा करावा ? यांचे भान त्यांना द्यावे. बाहेरच्या स्त्रीयांनी दरेकरांचे थोबाड रंगवण्यापेक्षा चित्राताई वाघ यांनीच या भरकटलेपणाला व भुरटेपणाला चाप लावावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here