Home गडचिरोली खळबळजनक :- नक्षलवाद्यांनी शेतकऱ्यांची गोळ्या झाडून केली हत्त्या.

खळबळजनक :- नक्षलवाद्यांनी शेतकऱ्यांची गोळ्या झाडून केली हत्त्या.

 

शेतकऱ्यांच्या पत्नीला घरात कोंडले तर शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून केला गोळीबार.

गडचिरोली न्यूज नेटवर्क :-

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा हौदास अजूनही संपला नसून या जिल्ह्यातील काही मोजक्या कारभारी लोकांना नक्षलवादी हे लक्ष करतात व त्यांचा सहभाग असल्याने त्यांची गोळ्या झाडून हत्त्या करतात त्यामुळे या जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा धाक निर्माण झाला आहे. अशाच प्रकारची घटना काल घडली असून गडचिरोली येथील पोलीस ठाण्यांतर्गत सुरजागड गावातील एका शेतकऱ्याची नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. ही घटना रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली या वेळी शेतकरी झोपले होते.त्यांची पत्नी आणि ते दोघेच घरात होते.मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव सोमाजी चैतू सडमेक असे आहे.

नक्षलवाद्यांनी रात्री सोमाजींना झोपलेले असताना उठवले आणि आपल्या सह बाहेर नेले त्यांनी बायकोला घराच्या आतच कोंडून ठेवले आणि बाहेर सोमजीवर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा मृतदेह मुख्य मार्गावर टाकला.त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडली आहे त्यात नक्षलवाद्यांनी जंगल,जमिनीवर फक्त लोकांचा हक्क आहे आणि लोहखाणी प्रकल्पाला आम्ही विरोध करतो तसेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दलांच्या दलाली करणाऱ्या नेत्यांना हाकलून काढण्याबाबतचे सांगितले आहे मयत झालेल्या सोमाजी यांना एक मुलगी आहे.घटनेच्या वेळी ती घरात नसून बाहेरगावी गेली होती.

Previous articleसंतापजनक :- खांबाडा गावाचे कारभारी गेले तरी कुठे? खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळेना?
Next articleदरेकर, तुम्ही फडणवीसांच्या बुडाचे मुके घेता काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here