Home वरोरा संतापजनक :- खांबाडा गावाचे कारभारी गेले तरी कुठे? खड्ड्यात रस्ते की रस्त्यात...

संतापजनक :- खांबाडा गावाचे कारभारी गेले तरी कुठे? खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळेना?

 

चंद्रपूर नागपूर हायवेला लागून खांबाडा गावाला जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा? गावकरी संतप्त?

खांबाडा(मनोहर खिरटकर)

“गाव हा विश्वाचा नकाशा ,गावावरून देशाची परिक्षा” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मधील ओवीचा अर्थबोध जर उलट होत असेल तर गावचे कारभारी करते तरी काय? असा प्रश्न गावातील सर्वसामान्य ग्रामस्थ आणि गुरुदेव भक्तांना पडायला लागला आहे. खाबांडा वरोरा तालुक्यातील चंद्रपुर जिल्हाचे प्रवेश द्वारा तथा नागपुर चंद्रपुर हायवेला लागलेले गावाचा गावात जाणारा मुख्य मार्ग तथा अन्तर्गत रस्त्याची अवस्था खड्डेमय झाल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत ,या गावाला कारभारीच नाही का? आहे ते फक्त निवडणुक आली की मतदान मागण्यासाठीच समोर येतात का? की त्यांनी स्वताच्या तुमड्या भरण्यासाठीच निवडणुकीत सहभाग घेतला आहे का? मग असे असेल तर गावातील सुज्ञ नागरिक नेमक्या कुठल्या भूमिकेत आहे? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहे.

हा रस्ता बोपापूर जाणारा असल्याने यावर वाहनाची तथा येणार्या जाणार्याची वर्दळ नेहमीच जास्त असते, सततधार पाऊसामुळे तथा नाल्याची सफाई तथा योग्य बाधकाम नसल्याने संपुर्ण पाणी रोडवर येत असल्याने रोडवर पाणी साचुन हा रस्ता पुर्णता उखडला आहे. स्थानिक नागरीकांना तथा बोपापूर जाणार्या नागरीकांना हा मार्ग मुख्य असल्याने याच खड्डेमय रस्त्यावरून जाणे भाग पडते या खड्यात पाणी साचुन राहत असल्याने या खड्याचा नेमका अंदाज येत नसल्याने कित्येक अपघात झालेत तरी स्थानिक राजकीय पुढार्याना जाग कशी येत नाही? याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे,

यापुर्वी खांबाडा येथील आरोग्य उपकेन्द्राचा लोकार्पण सोहळा झाला त्यावेळी प्रमुख अतिथि जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले आल्या होत्या त्यानी आपल्या मनोगतात या गावात येण्याची पहिली वेळ असल्याने मला या गावासाठी काहितरी देण आहे त्यामुळे या गावासाठि एक तीन लाखाचा रोड मी माझ्या जिल्हा परिषद निधीतुन देणार असल्याचे सागितले होते. पण येथील पुढार्याना याबाबीचा विसर पडल्याने आतापर्यत पाठपुरावा केलेला नाहित ,तथा स्थानिक ग्रामपंचायतने साधी डागडुजी सुध्दा केली नाही पण जड वाहणे या रोडवरून नेण्यास मनाई असल्याचा फलक लावला व दंड आकारण्यात येईल असे स्पष्ट लिहिलेले असताना सुध्दा रेतीने भरलेले ,सिमेट व खताचे वाहन याच्याच मर्जीने गावात नेले तरी कोणी त्यांना मनाई सुध्दा करत नसल्याने या रोडची दयनिय अवस्था झाली आहे. आता या परिस्थितीला जबाबदार ग्रामपंचायत पुढारी येथील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य कोणत्या बिळात लपलेले आहेत त्यांचा शोध लावून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव कोण करून देणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here