Home वरोरा प्रेरणादायी :- रविंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांचे पुसले अश्रू आणि दिला मदतीचा हात.

प्रेरणादायी :- रविंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांचे पुसले अश्रू आणि दिला मदतीचा हात.

 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने जळका, डोंगरगावटेमर्डा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत.

वरोरा प्रतिनिधी :-

मागील कोरोना काळात आणि नंतर सुद्धा दुःखात संकटात सापडलेल्या गोरगरिबांना व शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन आपले सर्वोच्य योगदान देणारे रवींद्र शिंदे यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे पण त्याहीपेक्षा ते स्वतःहून सर्वसामान्य माणसाच्या व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जातात ही तेवढीच महत्वपूर्ण बाब आहे. कारण एकिकडे ज्यांना जनतेने निवडून दिले ते लोकप्रतिनिधी जनतेच्या कसोटीवर खरे उतरले नाही तिथे रवींद्र शिंदे यांनी निस्वार्थपणे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत तसेच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल, रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दुःखी कष्टी जनतेला मदत करून जो प्रेरणादायी इतिहास निर्माण केला तो अविस्मरणीय असाच  आहे.

रवींद्र शिंदे यांनी नुकतीच वरोरा तालुक्यातील जळका, डोंगरगाव व टेमुर्डा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थीक मदत केली.त्यात वरोरा तालुक्यातील जळका येथील शेतकरी भालचंद्र गारघाटे यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने गोठ्यातील जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तसेच शेतीकामात येणारी अवजारे व खताच्या बॅग जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर द्वारा शेतकरी कल्याण निधी अंतर्गत तसेच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना तात्काळ मदत देण्यात आली आहे. डोंगरगाव येथील शेतकरी अनिल पुंडलीक सोमलकर यांना सुद्धा मदत करण्यात आली. कोरोनाने मृत झालेल्या व गोरगरीब शेतक-यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने उचलेल, अशी ग्वाही रवींद्र शिंदे यांनी दिली. यावेळी बैकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरेकर, प्रदीप देवतळे आदी उपस्थित होते.

*खांबाळा येथील आंदोलनाला भेट*
ग्रामीण भागात शेतक-यांच्या भेटीदरम्यान रवि शिंदे यांनी खांबाळा येथील एका आंदोलनाला सदिच्छा भेट देवून त्यांचे प्रश्न समजून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here