Home चंद्रपूर शेतीविश्व :- ड्रॅगन फ्रुटची शेती चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांना चकित करणारी?

शेतीविश्व :- ड्रॅगन फ्रुटची शेती चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांना चकित करणारी?

 

परंपरागत शेतीला फाटा देत राजुरा तालुक्यात साकारली ड्रॅगन फ्रुटची शेती.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

“आपल्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं” हे ज्याला कळलं तोच खरा शेतकरी ही म्हण आता संपूर्ण देशात रूजायला लागली आहे. त्यामुळे सध्या देशात आणि महाराष्ट्रात शेतीमध्ये नवनवे प्रयोग सुरू आहे. कारण परंपरागत शेती आता परवडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत यामधे आता ज्या पिकांना बाजारात चांगला भाव असतो तेच पीक शेतात घेण्याचे काम व्हायला हवे असा सूर निघत असताना चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा कृषी क्षेत्रात फार नवे बदल घडत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत पारंपरिक शेतीलाच महत्व असल्याचे चित्र दिसत असताना आता काही शेतकरी नवे प्रयोग करतांना दिसत आहे व त्यात त्यांना फायदाही झालेला दिसून येत आहे. असाच एक राजुरा येथील शेतकरी कवडू बोढे यांचा नवा प्रयोग यशस्वी झालेला दिसत आहे. त्यांनी पारंपरिक शेतीसोबतच ड्रॅगन फ्रुटची शेती करून सर्वांना चकित केले. कवडू बोढे हे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये नोकरीत होते. त्यांना दोन एकर शेती आहे. 2017 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. जवळच्या दोन एकरांपैकी एका एकरात ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा निर्धार केला. या फळात औषधीय गुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. पण चांद्रपूरसारख्या उष्ण भागात हे फळ येईल का, हा प्रश्न होता. त्यासाठी कृषी विभाग आणि या फळाच्या लागवडीचा अभ्यास त्यांनी केला. या कामात त्यांचा ग्रामसेवक मुलगा रवी यानेही मदत केली. आणि 2018 मध्ये याची लागवड केली. पाहिले दोन वर्षे जेमतेम पीक आल्यानंतर आता तिसऱ्या वर्षी चांगले उत्पादन हाती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट पोल, रिंग आणि ठिबक सिंचन आणि सेंद्रिय मिश्र खत यासाठी त्यांना प्रारंभी साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला. मात्र खर्चाच्या तुलनेत मिळणारा नफा शाश्वत असल्याने खर्च निघून नफा मिळू लागला. बाजारात 200 ते 250 रुपये किलोचा भाव असून, चंद्रपूर जिल्ह्यातच त्याची मागणी मोठी आहे. त्यामुळे बाजारपेठेचा मार्गही मोकळा झाला. ड्रॅगन फ्रुटची शेती हा जिल्ह्यासाठी नवा आणि पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याने इतरांसाठी प्रेरणादायी सुद्धा ठरलाय.

डायबिटीज व ह्रुदय रोगावर ड्रैगन फ्रूट खूप उपयोगी

ड्रैगन फ्रूट मधे नैसर्गिक एंटीऑक्सीडेंट प्रभाव सोबतच फ्लेवोनोइड, फेनोलिक एसिड, एस्कॉर्बिक एसिड आणि फाइबर आहे. हे तत्व ब्लड मधे शुगर ची मात्रा नियंत्रित करण्यासाठी मदत करते.सोबतच ज्यांना डायबिटीज नाही त्यांना ड्रैगन फ्रूट्स चे सेवन केल्याने डायबिटीज होत नाही त्यामुळे ड्रैगन फ्रूट हे डायबिटीज या जगातील सगळ्यात खतरनाक बिमारिवर मोठा उपाय आहे शिवाय यामुळे हृदय रोग वर सुद्धा प्रभावी औषध म्हणून काम करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here