आत्महत्याग्रस्त कुटूंबातील तीनही मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट करणार.
भद्रावती प्रतिनिधी :-
दहा दिवसाच्या कालावधीनंतरही मृतक शेतकरी कुटुंबीयांकडे माणुसकी हरवलेल्या लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ या मथळ्याची बातमी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल मधे तीन दिवसापूर्वी बातमी प्रकाशित करण्यात आली होती ती बातमी वाचताच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा आज (दि.२४) ला चंदनखेडा येथे जावून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला प्रत्यक्ष भेट दिली व कुटूंबीयांचे सांत्वन करुन त्यांना आर्थीक मदत दिली. तसेच त्या कुटूंबातील तीनही मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट करेल, असे जाहीर केले.
भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक माणिक सदाशिव बागेसर या शेतकऱ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे ६ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी चंदनखेडा शेत शिवारातील प्रकाश निमजे नामक शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. दोन दिवस शेतकऱ्याचा शोध घेतल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला ही वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली मात्र संबंधित कार्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याने गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. १० दिवसाचा कालावधी लोटत असतानाही या मृतक शेतकरी कुटुंबियांच्या परिवाराचे सांत्वन करण्यास कुणीही गेले नसल्याची बातमी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर झळकताच या वृत्ताची दखल घेवुन रवींद्र शिंदे हे त्यांच्या सहका-यांसह बागेसर यांच्या घरी पोहोचले. आत्महत्या केलेल्या शेतक-याची पत्नी सुजाता माणिक बागेसर व कुटूंबीयांशी चर्चा करुन त्यांचे सांत्वन केले. त्यांना आर्थीक मदत केली. सोबतच या कुटुंबातील मुले प्रशिक, अरोहन, व मुलगी आकांक्षा यांचा शैक्षणिक खर्च ट्रस्ट करेल, असे जाहीर केले. मोठा मुलगा प्रशिक, लहान मुलगा अरोहन व मुलगी आकांक्षा हे सदस्य आहे. प्रशिक इयत्ता १० वी चा तर अरोहन इयत्ता ७ वीचा विद्यार्थी आहे.आकाक्षा इयत्ता ५ वी ची विद्यार्थीनी आहे.
या प्रसंगी रवींद्र शिंदे यांच्या सोबत चंदनखेड्याचे सरपंच नयन जांभुळे, बिजोनीच्या सरपंचा सौ. मनिषा रोडे, ईश्वर धांडे, बाळासाहेब पडवे, सदाशिव बागेसर, दत्ताभाऊ बोरेकर, आदी उपस्थित होते.
माणिक बागेसर यांच्यावर सुमारे ४५ हजार रूपयाचे कर्ज होते. तसेच त्यांनी दोन वर्षापूर्वी घर बांधणीसाठी आप्तेष्टांकडून दिड लाखाचे कर्ज घेतले होते. शेतीत सतत नापीकी मुळे कर्जाचा डोंगर वाढत असल्याने माणिक यांच्यावर मानसिक तणाव येत असल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.माणिक बागेसर यांच्या आत्महत्येला १८ दिवस लोटून सुध्दा बागेसर कुंटबियांची सांत्वना किंवा या कुंटूबाला कुणीही सहकार्य केले नव्हते. यामुळे माणिक बागेसर यांची पत्नी सुजाता, मुले प्रशिक व अरोहन तसेच मुलगी आकांक्षा यांना सतत सामाजिक संवेदना हरविल्याचा अनुभव येत होता. गेल्या सतरा दिवसापासून बागेसर कुटूंबातील चारही सदस्य दुःखात होते.परंतु आज शुक्रवारला या कुटूंबियाला प्रत्यक्ष भेटून त्यांची सांत्वना केली. यामुळे बागेसर कुटूंबियाला संकटावर मात करून जगण्याची नवी उमेद प्राप्त झाली.