Home महाराष्ट्र महत्वाची बातमी :- आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द.

महत्वाची बातमी :- आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द.

 

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा, लाखो विद्यार्थ्याना बसला झटका.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

राज्यात येत्या २५ व २६ सप्टेंबरला होणार असलेली आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची घोषणा नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केल्याने या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे. या परीक्षेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.उमेदवारांच्या अडचणी- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य असे अनेक प्रश्न उभे ठाकले असल्याने आरोग्य विभागात गोंधळ उडाला होता.

आरोग्य विभागातील पदे १) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस… आदी पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार होती.

Previous articleअखेर भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या त्या बातमीची रवींद्र शिंदे यांनी घेतली दखल.
Next articleसंतापजनक :- अनेकदा निवेदन देऊन सुद्धा केम या गावाला नाही मिळाली स्मशानभूमी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here