केम गावातील ग्रामस्थाना प्रशासनाने सोडले वाऱ्यावर अनेकदा दिले होते निवेदन.
खांबाडा
मनोहर खिरटकर.
वरोरा तालुक्यातील टेमुर्ड्यापासून ९ किलोमीटरवर असलेले तिन्हिबाजुने झुडपी जंगलाने वेढलेले आणि याच जंगलात असणार्या सिताफळामुळे जिल्ह्यात वेगळी ओळख आहे
हा गाव सुमठाणा ग्रामपंचायत मध्ये येणारे असल्याने आधीच हे गाव विकासाच्या दृष्टिने मागासले आहे येथील ग्रामस्थानी अनेकदा शासनदरबारी स्मशानभूमी विषयी कैफियत सागितली कित्तेकदा निवदेन दिले पण आजतागायत येथे स्मशानभूमी झाली नाही यामुळेच येथील नागरीकाना स्मशानभूमी विषयी विचारले असता ते सांगतात आमच्या गावातील नागरिकांना महाभारातील काही गुरुवर्यासारखे येथील नागरीक अमरच असते यांना मरण नाही आणि त्यामुळेच येथे साधे स्मशानभूमी चे शेड तर सोडा साधी स्मशानभूमीसाठी जागा पण नाही. कदाचित संपुर्ण महाराष्ट्रात हे एक असं गाव आहे की इथे स्मशानभूमी नाही पण गावातील पुढाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधी यांना पण याविषयी जाण नसावी हे या गावाचे दुर्भाग्य च म्हणावे लागेल.
अंत्यविधीसाठी नागरिक संकटात?
झुडपी जंगल गावाला लागुंन असल्याने वनविभाग अंत्यविधी साठी मनाई करते मात्र तरीही स्थानिक नागरीकांना अंतिमसंस्कार जबरजस्तीने गावाला लागुन असलेल्या झुडपी जंगलातच करावा लागतो त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अर्थात अंत्यविधीसाठी गावकरी नेहमीच जणू संकटात असल्याचे चित्र आहे .