Home वरोरा खळबळजनक :- संग हॉटेलचे संदीप कोहडे यांची कळमना गावाजवळ गळफास लावून हत्त्या...

खळबळजनक :- संग हॉटेलचे संदीप कोहडे यांची कळमना गावाजवळ गळफास लावून हत्त्या की आत्महत्या?

 

वरोरा येथील रहिवाशी बल्लारपूर तालुक्यातील वन डेपोत गेला कसा? पोलीस तपासात काय होणार?

वरोरा प्रतिनिधी:-

वरोरा येथील शहरातील तलावाच्या बाजूला मुख्य रस्त्यावर असलेल्या संग हॉटेलचे संचालक संदीप बालाजी कोहडे यांचे बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावाजवळ गळफास घेवून आत्महत्या केल्याचे प्रेत सापडल्याने वरोरा शहरात एकच खळबळ उडाली असून अतिशय चांगल्या स्वभावाचा माणूस असा कसा आत्महत्या करेन? याविषयी प्रश्न निर्माण होत असून त्यांची हत्त्या की आत्महत्या हे पोलीस तपासा नंतरच कळेल.

बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावात संदीप बालाजी कोहडे (35) यांनी शुक्रवारी सकाळी वन विभागाच्या डेपोमध्ये गळफास लावून आत्महत्या केली असल्याची बातमी असून प्राथमिक तपासात घरगुती वादामुळे आत्महत्या केल्याची बाब समोर येत आहे. मात्र वरोरा येथील व्यक्ती बल्लारपूर इथे येणार कशाला? हा प्रश्न गंभीर असून त्याची हत्त्या की आत्महत्या? बल्लारपूर पोलिसांच्या तपासा नंतर समजणार आहे.

बल्लारपूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे आणि वन विभागाचे वनपाल भगीरथ पुरी यांच्या उपस्थितीत पोलिस पथकाने पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल चांदोरे करीत आहेत.

Previous articleसंतापजनक :- अनेकदा निवेदन देऊन सुद्धा केम या गावाला नाही मिळाली स्मशानभूमी?
Next articleशैक्षणिक :- कोरोना लॉक डाऊन काळात युवकांनी शैक्षणिक कार्यात केले मोठे योगदान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here