Home भद्रावती शैक्षणिक :- कोरोना लॉक डाऊन काळात युवकांनी शैक्षणिक कार्यात केले मोठे योगदान.

शैक्षणिक :- कोरोना लॉक डाऊन काळात युवकांनी शैक्षणिक कार्यात केले मोठे योगदान.

 

पूजा फौंडेशन तर्फे त्या युवकांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव.

गरीब गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप…

भद्रावती प्रतिनिधी :-

स्थानीक भद्रावती येथून जवळच असलेल्या पाणवडाळा या छोट्याश्या गावामध्ये कोरोनाच्या 2 वर्ष्याच्या काळात तेथील युवा सामाजिक कार्यकर्त्यानी तेथील विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सर्वीकडे शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागले होते कारण ऑनलाईन शिक्षणाचा गावातील विद्यार्थ्याना कुठलाही फायदा झाला नाही कारण त्यांच्याकडे अन्ड्रोइड मोबाईल नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याच काम या गावातील युवा सामाजिक कार्यकर्त मंगेश पिंपळकर, राहुल आवारी, ईश्वर उताणे, विवेक पिंपळकर हे करीत आहे.

त्या सामाजिक युवकांच्या या कार्याची दखल घेऊन पूजा फौंडेशन दादापुर यांच्या वतीने त्या युवा सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार करून तेथील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पूजा फौंडेशन चे अध्यक्ष अमोल मोरेश्वर नन्नावरे, उपाध्यक्ष अमोल ना बोधाने, सचिव अक्षयभाऊ बोंदगुलवार, सामाजिक कार्यकर्ते माननीय संजय जांभुळे (शिक्षक ),आशिषभाऊ कुंभारे तसेच तेथील सरपंच प्रदीप महाकुलकर, पोलीस पाटील रंजनाताई अस्वाले, विध्यार्थी व गावकरी आदी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here