Home महाराष्ट्र फक्त राजकारण :- राज्य सरकारने स्वतःचाच निर्णय बदलवून बहुसदस्यीय प्रभागाच्या घेतला निर्णय?

फक्त राजकारण :- राज्य सरकारने स्वतःचाच निर्णय बदलवून बहुसदस्यीय प्रभागाच्या घेतला निर्णय?

 

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या त्यानिर्णयाची उडवली खिल्ली.

नाशिक न्यूज नेटवर्क :-

राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तो निर्णय नेमका कशासाठी होता? स्वतः महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत मधे एक सदस्यीय प्रणाली आणली होती मग आता या सरकारला बहुसदस्यीय प्रभाग रचना का करावी वाटली हे समजायला मार्ग नाही असे म्हणत जेंव्हा देशातील इतर राज्यांत एक सदस्यीय वार्ड रचना आहे तर मग महाराष्ट्रातच बहुसदस्यीय प्रभाग प्रणाली का? हा प्रश्न मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महा विकास आघाडी सरकार ला विचारून बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या या निर्णयाची त्यांनी खिल्ली उडवली. ते पुढे म्हणाले की जेंव्हा प्रभाग रचनेत बहु नगरसेवक असतात त्यांचा एरिया माहीतच नसतो तर विकासाच्या व समस्या बाबतीत नगरसेवक एकमेकांकडे बोट दाखवतात शिवाय जर बार्डाचा नगरसेवक म्हणून एका मतदाराला तीन तीन दोन दोन मतदान कशाला करायला लावायचे? हे बंद झालं पाहिजे असेही ते म्हणाले।

या निर्णयानुसार मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल, तर नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र दोन सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही एक सदस्यीय पद्धतच असेल.

खरं तर गेल्या काही काळापासून वॉर्ड तसेच प्रभाग पद्धती निश्चित करण्यावरून राजकारण तापले असताना आता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाचे संदर्भ बदलणार असल्याने बदललेल्या परिस्थितीचा नेमका कोणाला राजकीय लाभ होणार यावरून आडाखे बांधले जात आहेत. या संदर्भातील अध्यादेश पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई वगळून अन्य महापालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. या निर्णयाचा फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आघाडी सरकारने हा निर्णय फिरवून पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत विरोधी पक्ष भाजपला आयते उमेदवार मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन आघाडीने आपला आधीचा निर्णय बदलल्याचे समजते. नव्या निर्णयानुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग असेल. मुंबई महापालिकेत पूर्वीचीच म्हणजे एक सदस्य प्रभाग पद्धत कायम असेल. तर नगरपालिकांमध्ये दोन तर नगर पंचायतीमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धत लागू असेल. यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करून राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती. पण एक सदस्यीय प्रणाली मधे भाजपला फायदा होईल या भीतीने महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला का? की सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता बळकावण्यासाठी हे पाऊल उचलले? हे येणाऱ्या काळातील निवडणूक निकालावरून स्पष्ट होणार आहे.

Previous articleशैक्षणिक :- कोरोना लॉक डाऊन काळात युवकांनी शैक्षणिक कार्यात केले मोठे योगदान.
Next articleसंतापजनक :- दारूच्या नशेत एका ट्रक ड्राईवरने 9 वर्षाच्या मुलीवरुन चालवला ट्रक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here