Home चंद्रपूर संतापजनक :- दारूच्या नशेत एका ट्रक ड्राईवरने 9 वर्षाच्या मुलीवरुन चालवला ट्रक.

संतापजनक :- दारूच्या नशेत एका ट्रक ड्राईवरने 9 वर्षाच्या मुलीवरुन चालवला ट्रक.

 

ड्राईवर प्रशांत पिंपळकर याला केली पडोली पोलीसांनी अटक.ताडाळी येथील घटना.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर नागपूर रोडवरील माजी आमदार जेनुद्दीन जव्हेरी यांच्या टाडाळी येथील सिमेंट प्रॉडक्ट प्लांट मधे मागील 10 वर्षापासून कश्यप नामक कुटुंब कामासाठी कार्यरत आहे त्या कश्यप च्या एका 9 वर्षाची मुलगी आई वडील काम करीत असताना ती खेळत होती त्या दरम्यान नशेत तूल्ल असलेल्या ड्राईवर प्रशांत पिंपळकर ने त्या खेळत असलेल्या मुलीच्या अंगावरून ट्रक नेल्याने ती जागीच ठार झाली.दरम्यान आता आपली काही खैर नाही म्हणून पाण्यात मुलीच्या रक्ताचे अंश गेल्याने पाणी लाल झाले असता ते निशाण मिटविण्यासाठी ड्राइवर प्रयत्न करीत असल्याची बाब हायड्रा गाडी चालकाचे लक्ष गेल्यावर मुलीला लगेच रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केलं.

दरम्यान माजी आमदार जेनुद्दीन जव्हेरी यांनी हे प्रकरण निपटारा करण्यासाठी म्रूतक परिवाराला 25 हजाराची मदत केली असल्याची माहिती आहे, आरोपी ड्राईवर प्रशांत पिंपळकर याला केली पडोली पोलीसांनी अटक करून त्याचेवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here