Home चंद्रपूर राज्यस्तरीय ट्रायबल फोरमच्या चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी विलास मडावी यांची नियुक्ती.

राज्यस्तरीय ट्रायबल फोरमच्या चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी विलास मडावी यांची नियुक्ती.

जिल्ह्यातील समाजांच्या सर्व संघटना कडून अभिनंदनाचा वर्षाव.

चंद्रपूर  प्रतिनिधी:-

आदिवासी समाजाच्या  सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले विलास रामदास मडावी यांची महाराष्ट्र राज्यामधील ट्रायबल फोरमच्या  चंद्रपूर जिल्हा महासचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.   आमदार निवास मुंबई येथे ट्रायबल फोरमची बैठक झाली. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी ही नियुक्ती केली आहे.

ट्रायबल फोरम हे संघटन  समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी, सामाजिक सांस्कृतिक पारंपरिक अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे.  वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे विलास मडावी यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

या बैठकीला पुणे विभागीय अध्यक्ष दिलीपआंबवणे. बुलढाणा जिल्हाध्यक्ष कासम सुरत्ने, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे, पुणे जिल्हाध्यक्ष रोहित सुपे,पुणे ट्रायबल युथ फोरमचे जिल्हाध्यक्ष विक्रम हेमाडे, पुणे विभागीय उपाध्यक्ष मारुती खामकर , इमाम केदार आदि उपस्थित होते.

.

 

 

 

Previous articleसंतापजनक :- दारूच्या नशेत एका ट्रक ड्राईवरने 9 वर्षाच्या मुलीवरुन चालवला ट्रक.
Next articleधक्कादायक :- राज्यातील आरोग्य विभागाच्या मेगा भरतीत मंत्र्यांच्या नावाने एजंटद्वारे लाखोंची वसुली?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here