Home महाराष्ट्र धक्कादायक :- राज्यातील आरोग्य विभागाच्या मेगा भरतीत मंत्र्यांच्या नावाने एजंटद्वारे लाखोंची वसुली?

धक्कादायक :- राज्यातील आरोग्य विभागाच्या मेगा भरतीत मंत्र्यांच्या नावाने एजंटद्वारे लाखोंची वसुली?

 

टोकन २ ते ३ लाख तर काम झाल्यावर १५ ते २० लाख देण्याची मागणी.

न्यूज नेटवर्क :-

आरोग्य विभागामार्फत २५ आणि २६ सप्टेंबर असे दोन दिवस गट क आणि ‘ड’ संवर्गाच्या पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांकडून सेटिंग लावण्याचे काम गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत वशिलेबाजी करून एका पदासाठी १५ ते २० लाख रुपये उकळले जात असल्याचे समोर आले आहे.

दै. मराठवाडाच्या साथीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये एजंटने पदासाठी पैशाची आणि आरोग्य संचालक कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सेटिंग असल्याचा खुलासा केला आहे. या गंभीर प्रकारामुळे एकूणच भरती प्रक्रिया बोगस पद्धतीने होणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान भरती प्रक्रियेचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडूनच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट थेट ऊत्तर प्रदेश मधील परीक्षा केंद्र देऊ केल्याने भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ सुरु आहे असे दिसते. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिल्याचे स्पष्ट केले.

सावधान आपली फसवणूक होऊ शकते?

आरोग्यमंत्र्यांशी ओळख आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आपला खास माणूस आहे. परीक्षा विभागात आमची सेटिंग आहे. हे मंत्री माझ्या जवळचे आहे. अशा थापा मारून एजेंट पैसे उकळविण्याचे काम करत असून याला सर्व सामान्य विद्यार्थी देखील बळी पडत आहे. मात्र भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने यात वशिलेबाजीने नोकरीची आशा धरणाऱ्यानी सावध राहण्याची गरज आहे. पैसे दिल्याचा किंवा घेतल्याचा विशेष ठोस पुरावा नसल्याने एजंट पळून जाण्याचा किवा पैसे न देण्याच्या घटना देखील याअगोदर घडल्या आहे.

एका पदासाठी दहा लाखांपासून २० लाखांचा रेट ठरल्याची चर्चा

आरोग्य विभागाच्या या भरतीसाठी अनेकांनी आपआपल्या परिणे लगे लावले आहेत. त्यानुसार एका एका पदासाठी तब्बल पाच ते २५ लाख रूपयांचा रेट ठरल्याचीही जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here