Home वरोरा प्रेरणादायी :- आदित्य जीवने यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून वरोरा शहराची...

प्रेरणादायी :- आदित्य जीवने यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून वरोरा शहराची मान उंचावली.

 

शहरातील मान्यवरांनी केला सत्कार, छोटूभाई शेख यांचा पुढाकार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहर हे प्रतिभासंपन्न शहर असून या शहराच्या बाजूला असलेले आनंदवन हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व पद्मश्री बाबा आमटे यांच्या कृष्टरोगी सेवा समिती मुळे ख्याती मिळवलेले शहर आहे आणि या शहरात अनेक कलावंत व उच्च दर्जाचे अधिकारी होऊन गेले आहे त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी नवनवे युवक किर्तिमान करत आहे त्यापैकी आदित्य चंद्रभान जीवने या विद्यार्थ्याने लोकसेवा आयोगाची (UPSC) मुख्य परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून वरोरा शहराच्या इतिहासात पुन्हा एक मनाचा तुरा रोवला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल वरोरा शहरातील नागरिकांना अभिमान असून वरोरा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती छोटूभाईशेख यांच्या नेतृत्वात शहरातील गनमान्य नागरिकांनी घरी जाऊन
आदित्य जीवने यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी छोटूभाई शेख. वसंतराव विधाते रूपलालजी कावडे. गोविंद्रावजी कोहपरे. धनराजजी असेकर. बाबा पाटील ठाकरे. सचिन मेश्राम राजू बनसोड. कैसर शहा. उपस्थित होते.

आदित्यने मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीचे फळ असून त्यांच्या या लक्षणीय यशाबद्दल वरोरा शहरातील नागरिकांना सार्थ अभिमान असल्याचे व या यशाचा प्रेरणादायी इतिहास पुन्हा पुढे नेण्याचे मत छोटूभाईशेख यांनी याप्रसंगी व्यक्त केले व आदित्यचे आणि त्याच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आदित्यला आगामी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Previous articleधक्कादायक :- राज्यातील आरोग्य विभागाच्या मेगा भरतीत मंत्र्यांच्या नावाने एजंटद्वारे लाखोंची वसुली?
Next articleआरोग्य :- बेलगाव येथील शेतकऱ्याच्या उपचारांसाठी रवींद्र शिंदे यांच्या संस्थेची मदत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here